Anand Mahindra Dainik Gomantak
देश

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली खऱ्या फुन्सुक वांगडूंची भेट

आनंद महिंद्रा फोटोसोबत लिहितात, 'सोनम वांगचुक आणि त्यांची जोडीदार गीतांजली यांना भेटण्याचा अनुभव किती छान होता!'

दैनिक गोमन्तक

सुमारे दशकभरापूर्वी आलेला बॉलिवूड सिनेमा 3 इडियट्स हा त्याच्या काळातील मोठा हिट ठरला होता. यात फुन्सुक वांगडू शोधकर्त्याची कथा दाखवण्यात आली होती. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी वास्तविक जीवनातील फुन्सुक वांगडू म्हणजेच सोनम वांगचुक यांची भेट घेतली. (Industrialist Anand Mahindra meets real Phunsukh Wangdu)

महिंद्रा समूहाला नव्या उंचीवर नेणारे उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून ते अनेक गरजूंना मदत करत असतात. त्यांनी वास्तविक जीवनातील फुन्सुक वांगडू म्हणजेच सोनम वांगचुक आणि त्यांची पत्नी गीतांजली यांच्यासोबतचे त्यांचे छायाचित्र शेअर केले आहे.

आनंद महिंद्रा फोटोसोबत लिहितात, 'सोनम वांगचुक आणि त्यांची जोडीदार गीतांजली यांना भेटण्याचा अनुभव किती छान होता! युनिव्हर्सिटीच्या प्रोजेक्टबद्दल दोघांशी चर्चा झाली. 3 इडियट्स सिनेमाचा नायक फुन्सुक वांगडू हा सोनमकडून प्रेरित होता. ते खऱ्या अर्थाने नवोदित आणि राष्ट्राची संपत्ती आहेत.

सोनम वांगचुक सिनेमात दाखवल्यापेक्षा जास्त हुशार आहेत. 1988 मध्ये, त्यांनी, काही विद्यार्थ्यांसह, लडाखच्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट (SECMOL) ची स्थापना केली, ज्याचा कॅम्पस स्वयंपाक, प्रकाश आणि उष्णता निर्माण करण्यासाठी फक्त सौर ऊर्जा वापरतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Politics: काही पक्ष फुटतात, काही का टिकतात?

Water Pipeline Burst: ट्रकच्या धडकेने जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया, कुळण-कारापूर येथील घटना

Crime News: मेहुण्यासोबत दारु पिली, अश्लील व्हिडिओ पाहिला अन्..., नशेत धुंद 12 वर्षांच्या मुलाकडून 9 महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार

Vegetable Price Hike: उष्णतेमुळे बाजारात महागाईचा तडाखा; पणजीसह राज्यात भाज्यांचे दर भडकले, लिंबू-शहाळ्याला मागणी वाढली

NEET Exam: 15 मिनिटे आधीच परीक्षा हॉलमधून बाहेर काढले? पेडण्यातील 'त्या' धक्कादायक घटनेने गोव्यात खळबळ; 'नीट' प्रशासनावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT