India's space agency ISRO is facing more than 100 cyber attacks every day Dainik Gomantak
देश

ISRO दररोज हाणून पाडते 100 हून अधिक सायबर हल्ले

Cyber Attacks On ISRO: "तंत्रज्ञान वरदान आणि धोका दोन्ही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगारांकडून निर्माण होणाऱ्या आव्हानांना आपण तोंड देऊ शकतो."

Ashutosh Masgaunde

India's space agency ISRO is facing more than 100 cyber attacks every day:

भारताची स्पेस एजन्सी इस्रोला दररोज 100 हून अधिक सायबर हॅकिंगच्या प्रयत्नांना सामोरे जावे लागत आहे. कोची येथे नुकत्याच झालेल्या सायबर सुरक्षा कार्यक्रमादरम्यान इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी ही माहिती दिली.

"फक्त इस्रोच नाही तर इतर अनेक यंत्रणा (इतर संस्थांच्या) ज्यांना शेकडो सायबर (हॅकिंग) प्रयत्नांना सामोरे जावे लागते. परंतु असे प्रयत्न आमच्या अनेक संरक्षण उपायांनी थांबवले आहेत. सायबर हल्ला तेव्हाच होतो जेव्हा तो सुरक्षा व्यवस्थेत घुसण्यात यशस्वी होतो.

पण प्रथम आम्ह असे घडूच देत नाही. अशा प्रयत्नांना तोंड देण्यासाठी इस्रोकडे मजबूत सुरक्षा नेटवर्क आहे. आमच्याकडे अनेक फायरवॉल आणि सुरक्षा यंत्रणा आहेत. त्यामुळे हल्लेखोरांचे हे सर्व प्रयत्न फेल होत आहेत,” असे सोमनाथ यांनी सांगितले.

इस्रो प्रमुख म्हणाले की सॉफ्टवेअर व्यतिरिक्त, इस्रो आता रॉकेटमधील हार्डवेअर चिप्सच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून वेगवेगळ्या चाचणीवर देखील पुढे जात आहे.

ते म्हणाले की, इस्रोकडे उपग्रह देखील आहेत जे सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात मदत करतात. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केले जातात. या सर्वांच्या सुरक्षेसाठी सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.

एस सोमनाथ म्हणाले की, तंत्रज्ञान वरदान आणि धोका दोन्ही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगारांकडून निर्माण होणाऱ्या आव्हानांना आपण तोंड देऊ शकतो. या दिशेने संशोधन आणि मेहनत व्हायला हवी.

सोमनाथ यांनी देशाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अतिशय मजबूत सायबर सुरक्षा समज आणि ज्ञानाची गरज असल्याचे सांगितले.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, चंद्रावर लँडिंगशी संबंधित एक छोटासा कार्यक्रम देखील चालवणे किती क्लिष्ट आहे आणि अशा कोणत्याही अंतराळ क्रियाकलापांशी संबंधित धोका किती मोठा आहे.

इस्रो प्रमुखांनी एकदा प्रक्षेपित झाल्यानंतर उपग्रहाची सुरक्षा यंत्रणा अपग्रेड करण्याच्या आव्हानांबद्दलही सांगितले.

हे एक मोठे आव्हान का आहे याबद्दल, सोमनाथ म्हणाले की, जेव्हा संस्थेने एक कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित केला तेव्हा तो तेथे 15 वर्षे टिकून राहणे अपेक्षित आहे. यासाठी सॉफ्टवेअर बदल, ऑपरेटिंग सिस्टम, हार्डवेअर इत्यादींचे अपग्रेडेशन किती महत्त्वाचे आहे याची कल्पना तुम्ही करू शकता.

केरळ पोलीस आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी रिसर्च असोसिएशनने येथे या परिषदेचे आयोजन केले होते हे विशेष.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

Curlies Restaurant Sealed: मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

सातारा-सोलापूर महामार्गावर 48 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त, 5 जणांना बेड्या; महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT