Monkeypox  ANI
देश

India's First Monkeypox Death: देशात मंकिपॉक्सचा पहिला बळी

केरळमधील 22 वर्षीय तरूणाला परदेशात झाला होता संसर्ग

गोमन्तक डिजिटल टीम

कोरोनाच्या संकटातून नागरिक बाहेर पडत असताना मंकीपॉक्सचे (monkeypox ) संकट समोर येऊन ठेपले आहे. भारतात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात केरळमध्ये मंकिपॉक्सचा पहिला रूग्ण आढळला आला. केरळमध्ये आजवर तीन रूग्ण आढळले आहेत. त्यापैरकी युएई (UAE) वरून परतलेल्या तरूणाचा शनिवारी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतातील मंकिपॉक्सचा हा पहिला बळी असून, आफ्रिेकेबाहेरचा चौथा बळी आहे. (India’s first monkeypox death reported in Kerala)

केरळमधील पुन्नियूर, त्रिशूर येथील रहिवाशी असेलला या 22 वर्षीय तरूणाला युएई मध्येच मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी त्याचा मृत्यू झाला आहे. देशातील हा पहिला मंकीपॉक्सचा बळी ठरला आहे. तरूणाच्या कुटुंबियांनी त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याची माहिती शनिवारी रूग्णालयाकडे जमा केली. परदेशातच त्याला संसर्ग झाल्याचे कागदपत्रावरून निष्पन्न झाले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.

तरूण 22 जुलै रोजी युएई वरून परतला त्यावेळी तो तंदुरूस्त होता. मित्रांसोबत तो खेळला देखील, 26 तारखेला त्याला ताप आल्याने स्थानिक रूग्णालयात त्यांने उपचार घेतले. पुढील उपचारासाठी त्याला दुसऱ्या रूग्णालयात हलविण्यात आले. तब्येत जास्त बिघडल्याने त्याला लाईफ सपोर्ट लावला होता. दरम्यान, शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. शासकिय नियमांनुसार त्याचा अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

भारतात आत्तापर्यंत चार मंकिपॉक्सचे रूग्ण आढळले आहेत, त्यापैकी तीन केरळमधील आहेत. एकाचा शनिवारी मृत्यू झाला आहे. जगातील 80 देशात 22 हजार मंकिपॉक्सचे रूग्ण आढळून आले आहेत. आजवर 75 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू आफिकेतील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT