Union Minister Jitendra Singh Twitter/ @DrJitendraSingh
देश

भारताचे पहिले मानवयुक्त समुद्री मिशन सुरु, समुद्रयान केले लॉन्च

भारताच्या पहिल्या मानवयुक्त सागरी मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Union Minister Jitendra Singh) यांनी शुक्रवारी येथे केला.

दैनिक गोमन्तक

भारताच्या पहिल्या मानवयुक्त सागरी मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Union Minister Jitendra Singh) यांनी शुक्रवारी येथे केला. यासह भारत अशा राष्ट्रांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला ज्यांच्याकडे सागरी क्रियाकलाप करण्यासाठी पाण्याखालील वाहने आहेत. यावेळी बोलताना सिंह म्हणाले की, देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. जेव्हा एक भारतीय गगनयान कार्यक्रमातर्गंत (Gaganyan Program) अंतराळात जातो, तेव्हा दुसरा समुद्रामध्ये अंतरिक्षासारखं नवे काही शोधण्याचा प्रयत्न करतो.

मंत्र्याने ट्विट करत म्हटले की, भारताचे पहिले मानवयुक्त महासागर मिशन समुद्रयान (Mission Ocean) चेन्नईत लॉन्च झाले. अशा पाण्याखालील वाहनांसाठी भारत आता अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीनच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे. पिण्याचे पाणी आणि स्वच्छ ऊर्जेसाठी सागरी संसाधनांचा शोध घेण्याचा नवा अध्याय सुरु होत आहे. ते पुढे असेही म्हणाले की, 'आपण प्रत्यक्षात जे योगदान देत आहोत ते केवळ वैज्ञानिक कार्याच्या व्याप्तीपुरते मर्यादित नाही तर ते भारताचा राष्ट्रीय सन्मान निर्माण करण्यातही योगदान देईल.'

'हे तंत्रज्ञान विज्ञान मंत्रालयाला मदत करेल त्याचबरोबर हजार आणि 5500 मीटर खोल समुद्रात पाममेटॅलिक मॅंगनीज नोड्यूल, गॅस हायड्रेट्स, हायड्रोथर्मल सल्फाइड आणि कोबाल्ट क्रस्ट्स यासारख्या निर्जीव संसाधनांचा शोध घेण्यासही मदत होईल. मॅनड सबमर्सिबल फिशिंग 6000 (मत्स्य 6000) चे काम पूर्ण झाले असून ते इस्रो, आयआयटीएम आणि डीआरडीओसह विविध संस्थांसोबत सुरु करता येईल,' अशी माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT