IND vs ENG Dainik Gomantak
देश

IND vs ENG: टी-20 विश्‍वकरंडकाची रंगीत तालीम आजपासून, महिला संघ इंग्लंड संघाशी लढणार

IND VS ENG T-20: इंग्लंडमध्ये पुढील वर्षी (२०२६) महिलांच्या टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची रंगीत तालीम उद्यापासून (ता. २७) सुरू होणार आहे.

Sameer Amunekar

नॉटिंगहॅम : इंग्लंडमध्ये पुढील वर्षी (२०२६) महिलांच्या टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. आता भारतीय महिला क्रिकेट संघासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे. या दोन देशांमध्ये पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे. यापैकी पहिला सामना नॉटिंगहॅम येथे पार पडणार आहे.

टी-२० विश्‍वकरंडकाला अद्याप वर्षभराचा अवधी आहे, पण भारत व इंग्लंड या दोन्ही संघांना पाच सामन्यांच्या मालिकेपासून तयारी करता येणार आहे. शेफाली वर्मा हिचे भारतीय महिला संघात पुनरागमन झाले आहे.

तसेच क्रांती गौड, श्री चरणी व सायली सातघरे या नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. शेफाली वर्मा व स्मृती मानधना यांच्या खांद्यावर सलामी फलंदाजीची जबाबदारी असणार आहे. उमा छेत्रीला आपला ठसा उमटवावा लागणार आहे.

स्नेह, अमनज्योतकडून आशा

स्नेह राणा व अमनज्योत कौर या दोन अष्टपैलू खेळाडूंचेही भारतीय महिला संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. रेणूका सिंग व पूजा वस्त्रकार या वेगवान गोलंदाजांना दुखापत झाली आहे. त्यामुळे या मालिकेत दोनही खेळाडूंची अनुपस्थिती असणार आहे. भारतीय संघात संधी मिळालेल्या युवा खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चमक दाखवावी लागणार आहे.

भारतीय महिला संघाची फलंदाजीची मदार अनुभवी खेळाडूंवर असणार आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष या खेळाडूंना फलंदाजीत प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवर वर्चस्व दाखवावे लागणार आहे.

प्रतिस्पर्ध्याचे आव्हान

भारतीय संघासमोर इंग्लंडसारखा बलाढ्य प्रतिस्पर्धी आहे. इंग्लंडच्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. ॲमी जोन्स, टॅमी ब्यूमोंट, डॅनी वॅट, सोफी एक्लेस्टोन या अनुभवी खेळाडूंमुळे इंग्लंड संघाचे पारडे जड आहे. इंग्लंडच्या संघात युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. इसी वोंग, एलिस कॅपसी व सोफिया डंकली या युवा खेळाडूंची कामगिरी कशी होते, याकडेही लक्ष असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT