Virat Kohli Dainik Gomantak
देश

Virat Kohli Retirement: किंग कोहलीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; निवृत्तीची घोषणा

Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करुन कसोटी क्रिकेटला अलविदा केला.

Manish Jadhav

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करुन कसोटी क्रिकेटला अलविदा केला. विराटने गेल्या आठवड्यात निवृत्तीचा इरादा व्यक्त केला होता. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर विराटच्या कसोटी निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर सोमवारी (12 मे) विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

कसोटीतील 'विराट'चा 14 वर्षांचा प्रवास थांबला

विराटने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, ''मी 14 वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅगी ब्लू जर्सी घातली होती. खरं सांगायचं तर, हा फॉरमॅट मला अशा दिशेने घेऊन जाईल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉरमॅटने माझी क्षणोक्षणी परीक्षा घेतली. व्हाईट जर्सीमध्ये भारतासाठी खेळणे हा माझ्यासाठी खूप खास अनुभव होता. या फॉरमॅटपासून दूर जाणे माझ्यासाठी सोपे नव्हते. मी जेव्हाही कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरलो तेव्हा नवी उमेद घेऊन उतरलो. मात्र आता थांबण्याची वेळ आली आहे. या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमीच हसतमुखाने पाहीन.''

विराट आता केवळ वनडे क्रिकेट खेळणार

आता विराट फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल. गेल्या वर्षी टीम इंडियाने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. विराटने 123 कसोटी सामने खेळले असून 210 डावांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या. यामध्ये 30 शतके आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 1027 चौकार आणि 30 षटकार मारले. याशिवाय, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 125 सामन्यांमध्ये 48.7 च्या सरासरीने आणि 137.05 च्या स्ट्राईक रेटने 4188 धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये विराटने 302 सामन्यांमध्ये 57.८88 च्या सरासरीने आणि 93.35 च्या स्ट्राईक रेटने 14181 धावा केल्या असून यामध्ये 51 शतके आणि 74 अर्धशतकांचा समावेश आहे.

विराट तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार राहिला

विराटने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे (Team India) नेतृत्वही केले आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो पहिल्यांदाच कर्णधार बनला. तेव्हापासून 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापर्यंत तो कसोटी संघाचा कर्णधार राहिला. त्याचवेळी, 2021 मध्ये, त्याच्याकडून टी-20 आणि वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. विराटने 20 जून 2011 रोजी सबिना पार्क येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT