shubman gill and yashasvi jaiswal Dainik Gomantak
देश

IND vs WI 2nd Test: बाय-लेगबायशिवाय उभारला 518 धावांचा डोंगर! भारतानं मोडला बांगलादेशचा वर्ल्ड रेकॉर्ड; टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास VIDEO

Team India Record: वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी करत अनेक मोठे रेकॉर्ड मोडले.

Manish Jadhav

Team India Record: वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी करत अनेक मोठे रेकॉर्ड मोडले. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) यांनी शतके झळकावत भारताला 518 धावांच्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली. या सामन्यात वेस्ट इंडीजचे गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले.

बाय-लेगबायशिवाय 518 धावांचा विश्वविक्रम

भारतीय संघाने 518 धावा करुन आपला डाव घोषित केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात, कोणत्याही बाय किंवा लेग बाय धावेचा समावेश न करता केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली.

  • बांगलादेशचा विक्रम मोडीत: यापूर्वी, हा विश्वविक्रम बांगलादेशच्या (Bangladesh) नावावर होता. बांगलादेशने 2018 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना बाय किंवा लेगबायशिवाय 513 धावा केल्या होत्या.

  • आता भारतीय संघाने ही मोठी कामगिरी आपल्या नावावर करत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

भारताला मिळाली दमदार सुरुवात

या सामन्यात सलामीसाठी आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जायसवाल यांनी टीम इंडियाला (Team India) दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. राहुल 38 धावा करुन जोमेल वॉरिकनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षकाकरवी त्रिफळाचीत (stump out) झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या साई सुदर्शनने चांगली फलंदाजी करत 87 धावांचे योगदान दिले. तो शतकापासून थोडक्यात वंचित राहिला.

जयस्वालचे शतक, गिलचीही शतकी खेळी

एक बाजू यशस्वी जयस्वालने भक्कमपणे सांभाळून ठेवत वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना संधी दिली नाही. त्याने विंडीजच्या गोलंदाजीवर आक्रमक फटकेबाजी केली.

  • यशस्वी जयस्वाल: त्याने 175 धावांची मोठी खेळी साकारली, ज्यात 22 चौकारांचा समावेश होता. गैरसमजातून धावबाद झाल्यामुळे त्याची मोठी खेळी संपुष्टात आली.

  • शुभमन गिल: जयस्वाल बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिलनेही आपले कर्तव्य बजावत 129 धावांचे शानदार शतक पूर्ण केले आणि तो नाबाद राहिला.

  • इतरांचे योगदान: याशिवाय, नितीश कुमार रेड्डी (43 धावा) आणि ध्रुव जुरेल (44 धावा) या दोघांनीही अर्धशतक हुकले असले तरी महत्त्वाचे योगदान दिले. या सर्व फलंदाजांच्या कामगिरीमुळेच भारतीय संघ 518 धावांच्या मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचू शकला आणि कर्णधाराने डाव घोषित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुनेत्रा पवारांनी घेतली पद अन् गोपनीयतेची शपथ, महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला 'उपमुख्यमंत्री'; PM मोदींकडून शुभेच्छा VIDEO

Operation Herof2: बलुचिस्तानमध्ये क्वेटासह 10 शहरांवर बलोच बंडखोरांचा ताबा, पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळाले; 10 ठार VIDEO

Pakistan Economy Crisis: "मुनीर अन् मी पैसे मागतो तेव्हा..." शहबाज शरीफ यांनी मांडली आर्थिक गुलामगिरीची व्यथा; परकीय कर्जाच्या अटींपुढे झुकला पाकड्यांचा कणा

Congo Landslide: 'कांगो'मध्ये निसर्गाचा महाप्रलय! मुसळधार पावसानं डोंगराचा कडा कोसळून 200 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये मुलांचाही समावेश VIDEO

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

SCROLL FOR NEXT