India Defence Exports Dainik Gomantak
देश

India Defence Exports: भारताचा दुहेरी विजय! एकीकडे पाकिस्तानला नमवलं, दुसरीकडे केला 'हा' जागतिक विक्रम

Indian Arms Export Statistics: आज भारत जगातील 80 देशांना शस्त्रास्त्रे आणि संरक्षण उपकरणे निर्यात करतो. 2024-25 या आर्थिक वर्षात, भारताची संरक्षण निर्यात गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत 34 टक्क्यांनी वाढून 23,662 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Manish Jadhav

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 मे रोजी झालेल्या युद्धबंदीच्या घोषणेने काहीसा तणाव निवळला. त्याच्याआगोदर मेड इन इंडिया ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या मदतीने भारताने पाकिस्तानच्या 5 हवाई तळांसह 9 दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची ठिणगी 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी पडली, ज्यामध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी 25 भारतीय आणि एका नेपाळी पर्यटकाची हत्या केली. यानंतर, 7 मे रोजी भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला, ज्यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 सदस्यांसह 100 दहशतवादी मारले गेले. या सगळ्यामध्ये, भारताच्या संरक्षण निर्यातीबाबत एक आनंदाची बातमी आली आहे.

भारत 80 देशांना शस्त्रास्त्रांची निर्यात करतो

आज भारत जगातील 80 देशांना शस्त्रास्त्रे आणि संरक्षण उपकरणे निर्यात करतो. 2024-25 या आर्थिक वर्षात, भारताची संरक्षण निर्यात गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत 34 टक्क्यांनी वाढून 23,662 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी 2029 पर्यंत 50,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले आहे. 2024-25 मध्ये भारताची संरक्षण निर्यात 23,662 कोटी रुपये होती, तर 2013-14 मध्ये संरक्षण निर्यात फक्त 686 कोटी रुपये होती. 2024-25 मध्ये, भारताच्या खाजगी क्षेत्राने 15,233 कोटी रुपयांची शस्त्रे आणि संरक्षण उपकरणे निर्यात केली आहेत. डीपीएसयूने 8,389 कोटी रुपयांची शस्त्रे आणि संरक्षण उपकरणे निर्यात केली आहेत.

ही शस्त्रे निर्यात केली जातात

भारत विविध प्रकारची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे निर्यात करतो, ज्यात क्षेपणास्त्रे, तोफखाना तोफा, विमाने, रडार, चिलखती वाहने आणि दारुगोळा यांचा समावेश आहे. अलिकडच्या वर्षांत भारताची संरक्षण निर्यात वाढली असून आता तो जगातील अव्वल शस्त्रास्त्र निर्यातदारांपैकी एक आहे. भारताचे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र, आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे, पिनाका रॉकेट आणि लाँचर्स जगभरातील अनेक देशांनी खरेदी केले आहेत. याशिवाय, के9 वज्र आणि बीओटी आणि डोर्नियर-228 विमाने, तेजस हलके लढाऊ विमान यासह विविध प्रकारच्या तोफा खरेदी केल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पाकिस्तान झिंदाबाद' फलकप्रकरणी हणजूण पोलिसांची मोठी कारवाई, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हिस्की पीडिया स्टोअरचे मालक अडचणीत!

Goa Crime: 63 वर्षीय भाडेकरुची निर्घृण हत्या, डोंगर कापणीच्या तक्रारीतून अज्ञातांकडून मारहाण; मोरजीतील धक्कादायक घटना

IND vs SA: दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतची धमाकेदार एंट्री; सोपवली उपकर्णधारपदाची जबाबदारी!

''माझी साथ विसरलास का?'', विराटच्या प्रेमात बनवली रील, कोहलीला 'बेवफाह' म्हणणाऱ्या पोस्टवर अनुष्काची लाईक; Video

Video: गोवा किंवा देशात पाकिस्तानच्या समर्थनाथ घोषणाबाजी देण्याचे कोणालाच धाडस नाही, तरुणांनी शांत राहावे; मायकल लोबो

SCROLL FOR NEXT