India vs Australia ODI Series Schedule
महिला एकदिवसीय विश्वचषक सप्टेंबर २०२५ च्या अखेरीस भारतात खेळला जाईल, ज्यामध्ये एकूण ८ संघ सहभागी होतील. या मेगा इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाच्या कामगिरीवर असतील. त्याच वेळी, या स्पर्धेच्या तयारीसाठी, टीम इंडिया सप्टेंबरच्या सुरुवातीला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाचा सामना करेल, ज्यामध्ये त्यांना तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
२०२५ मध्ये उत्तम कामगिरी करणारा भारतीय महिला संघ १४ सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना १७ सप्टेंबर रोजी खेळला जाईल, तर शेवटचा सामना २० सप्टेंबर रोजी होईल.
एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहेत, ज्यामध्ये सर्व सामने दिवस-रात्र आहेत आणि ते भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होतील. टीम इंडिया ही मालिका एकदिवसीय विश्वचषक लक्षात घेऊन खेळणार आहे, ज्यामध्ये सर्व महत्त्वाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवलं जाईल.
भारतीय महिला संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे, त्याआधी टीम इंडियाला २८ जून ते २२ जुलै दरम्यान इंग्लंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्याची सुरुवात पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने होईल.
त्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाईल. भारतीय महिला संघाने अलीकडेच श्रीलंकेचा दौरा केला जिथे त्यांनी तेथे खेळलेली एकदिवसीय तिरंगी मालिका जिंकली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.