India strongly condemns killing of two Sikh brothers in Pakistan Dainik Gomantak
देश

पाकिस्तानातील शीख बांधवांच्या हत्येबद्दल भारताने व्यक्त केला तीव्र निषेध

पाकिस्तानातील पेशावरमध्ये शीख व्यावसायिकांच्या हत्येचा भारत सरकारने तीव्र निषेध नोंदवला आहे. मंत्रालयाने सांगितले की, सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे शेजारील देशात अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानातील पेशावरमध्ये शीख लोकांच्या हत्येचा भारत सरकारने तीव्र निषेध नोंदवला आहे. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदनही जारी करण्यात आले आहे. मंत्रालयाने सांगितले की, सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे शेजारील देशात अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. दु:ख व्यक्त करत भारताने पाकिस्तानकडून या घटनेची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

(India strongly condemns killing of two Sikh brothers in Pakistan)

अज्ञातांनी गोळ्या झाडल्या

विशेष म्हणजे पाकिस्तानातील पेशावरमध्ये रविवारी दोन शीख बांधवांची हत्या करण्यात आली होती. कुलजीत सिंग आणि रणजित सिंग अशी मृतांची नावे आहेत. या दोघांचीही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सरबंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

भारत सरकारचा निषेध

भारत सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की शीख समुदायाच्या विविध वर्गांनी तसेच भारतीय समाजातील विविध घटकांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना सतत लक्ष्य केल्याबद्दल आम्ही पाकिस्तान सरकारकडे आमचा निषेध नोंदवला आहे. या घटनेची त्वरीत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे.

शिखांवर आठ महिन्यांत दुसरा हल्ला

गेल्या आठ महिन्यांत पेशावरमध्ये शीख समुदायावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. याआधी गेल्या वर्षी सप्टेंबर 2021 मध्ये शीख हकीमला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. शीख हकीम यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी इसिसच्या एका शाखेने घेतली आहे.

असे पाक पंतप्रधान म्हणाले

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पेशावरमध्ये शीख व्यावसायिकांच्या हत्येच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि तीव्र निषेध केला. संशयितांच्या अटकेसाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिले. या घटनेसाठी त्यांनी पाकिस्तानच्या शत्रूंना जबाबदार धरले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी शीख व्यापारी त्यांच्या दुकानात पोहोचले तेव्हा दोन हल्लेखोर मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. ही घटना का घडली हे अद्याप समजू शकलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT