Indian Famous Beaches: Dainik Gomantak
देश

Indian Famous Beaches: भारतातील 'या' बीचवर मिळेल विलोभनीय सूर्यास्त अन् मस्त नाईटलाइफचा आनंद

गोवा, केरळ, अंदमान आणि निकोबार, कर्नाटक, लक्षद्वीप आणि भारतातील इतर अनेक राज्यांमध्ये अनेक निसर्गरम्य बीच आहेत.

दैनिक गोमन्तक

Indian Famous Beaches: निसर्गाशी संबंधित असे कोणतेही सौंदर्य नाही, जे भारतात नाही. दूरवर पसरलेला अथांग निळा समुद्र असो, पर्वतांवरून कोसळणारे धबधबे, तलाव, हिरवीगार जंगले किंवा सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सौंदर्य असो, हे सर्व तुम्हाला भारतात पाहायला मिळेल. भारतात केवळ संस्कृती आणि भाषांमध्ये विविधता नाही तर देशाला जगभरात ओळख मिळवून देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. भारताकडे 7500 किमी पेक्षा जास्त विस्तीर्ण किनारपट्टीसह नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांचा खजिना आहे. गोवा, केरळ, अंदमान आणि निकोबार, कर्नाटक, लक्षद्वीप आणि देशातील इतर अनेक राज्यांमध्ये अनेक समुद्र किनारे आहेत. आज आम्ही अशाच काही समुद्रकिना-यांबद्दल सांगणार आहोत.

  • बागा बीच

गोव्याला सुंदर समुद्रकिनारे लाभले आहेत. उत्तर गोव्यातीलबागा बीच खुप प्रसिध्द आहे. हे गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे. जेट स्की, बनाना राईड, बंपर राइड आणि पॅरासेलिंग हे काही प्रसिद्ध जलक्रीडा आहेत. ज्यांचा तुम्ही या बीचवर आनंद घेऊ शकता. जसजसा दिवस मावळतो तसतसा हा समुद्रकिनारा आकर्षक बनतो.

baga Beach
  • राधानगर बीच

सुंदर हॅवलॉक बेटावर वसलेला राधानगर बीच अंदमान बेटांमधील एक लोकप्रिय बीच आहे. हा उष्णकटिबंधीय जंगलांनी वेढलेला एक प्राचीन पांढरा वाळूचा समुद्रकिनारा आहे. राधानगर बीच हे पोहण्यासाठी आणि उन्हात आराम करण्यासाठी योग्य ठिकाण आहे. इथे ट्रेकिंगचेही अनेक पर्याय आहेत. ट्रेकिंग राधानगर बीचपासून सुरू होणारी सुंदर पायवाट एलिफंट बीचकडे जाते, जिथे ती संपते. या समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताचे अद्भुत दृश्याचे दर्शन घेता येइल.

radhanagar beach
  • ओम बीच

भारतातील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक, ओम बीच गोकर्ण मंदिराच्या शहरात स्थित आहे. समुद्रकिनाऱ्याचे नाव ओमच्या आकारावरून पडले आहे. ओम हा शब्द हिंदू धर्मात पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. हा मोठ्या प्रमाणात वालुकामय समुद्रकिनारा आहे. काही ठिकाणी खडकाळ जमीन आहे. मनमोहक हिरवाईने वेढलेला हा समुद्रकिनारा अरबी समुद्राचे विहंगम दृश्य आणि हिरवागार परिसराचे दर्शन देतो. एका फ्रेममध्ये ओमचा आकार पाहण्यासाठी, ओम बीच व्ह्यूपॉईंटला भेट द्या. पॅरासेलिंग, सर्फिंग आणि जेट स्कीइंगचा तुम्ही आनंद घेउ शकता.

om beach
  • पुरी बीच

पुरी हे पवित्र तीर्थक्षेत्र दिव्य पुरी बीचचे घर आहे. हा भारतातील (India) सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. या सोनेरी वाळूच्या समुद्रकिनाऱ्यासोबतच, पुरीतील प्राचीन श्री जगन्नाथ मंदिर देखील लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

हे भव्य मंदिर वार्षिक रथ उत्सवसाठी प्रसिद्ध आहे. पुरी समुद्र किनारा पोहण्यासाठी उत्तम जागा आहे. समुद्राच्या किनाऱ्यावरून आपण बंगालच्या उपसागराचे चित्तथरारक दृश्य पाहू शकता. या बीचवर संध्याकाळी उंटाची सवारी आणि घोडेस्वारीही केली जाते. तुम्हाला स्थानिक कलाकृती आणि हातमागाच्या वस्तू खरेदी करायच्या असतील, तर समुद्रकिनारी असलेल्या स्टॉल्सना भेट द्या. हा समुद्रकिनारा सुदर्शन पटनायक सारख्या वाळू कलाकारांची कला देखील प्रदर्शित करतो. याशिवाय दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात येथे बीच फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. हा महोत्सव राज्याच्या कलात्मक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन आहे.

puri beach
  • लाइटहाउस बीच

लाइटहाउस बीच हा उष्णकटिबंधीय मलबार किनार्‍यावर वसलेला कोवलममधील एक सुंदर पांढरा वाळूचा समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनाऱ्याच्या दक्षिणेला असलेल्या विझिंजम लाइटहाऊसवरून त्याचे नाव पडले. सर्पिल पायऱ्यांद्वारे तुम्ही दीपगृहाच्या शीर्षस्थानी जाऊ शकता. ज्यांना पायऱ्या चढायचे नाहीत त्यांच्यासाठी लिफ्टचीही सोय आहे. लाइटहाऊस व्ह्यूपॉईंट समुद्रकिनारा आणि निळ्या पाण्याच्या समुद्राचे आश्चर्यकारक दृश्य देते.

light house beach

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT