Ashwini Vaishnaw Addressing IGF
Ashwini Vaishnaw Addressing IGF X Social Media
देश

IGF London: भारतीयांनी मोदींवर दाखवलेल्या विश्वासाने लोकशाहीच्या टीकाकारांचे तोंड बंद केले - अश्विनी वैष्णव

Pramod Yadav

इंडिया ग्लोबल फोरमच्या वतीने आयोजित वार्षिक IGF लंडन ऐतिहासिक क्वीन एलिझाबेथ II केंद्रात सुरू झाले आहे. येथे मोदी सरकारमधील नव्याने शपथ घेतलेले रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभा निकालानंतर पहिले जागतिक स्तरावरील भाषण केले.

भारतीय लोकशाही वायब्रंट असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. माजी महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी पराभवानंतर कंबर कसल्याचे देखील वैष्णव यावेळी म्हणाले.

भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला होता. याला उत्तर देताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीय लोकशाही ब्रायब्रंट असल्याचे सांगितले. तसेच, निवडणूक निकालाने टीकाकारांचे तोंड बंद केल्याचे म्हटले.

सहा दशकानंतर देशात आघाडीचे सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाले आहे. देशातील नागरकांनी नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या पॉलिसीवर विश्वास ठेवल्याचे यातून दिसून येते. या निकालाने लोकशाही धोक्यात असल्याचा प्रचार करणाऱ्या टीकाकारांचे तोंड बंद केल्याचे वैष्णव त्यांच्या भाषणात म्हटले.

भारत लोकशाहीची जननी आहे. देशातील लोक शांततेने त्यांच्या अधिकाराचे पालन करुन सरकारवरील विश्वास दाखवू शकतात, असे मंत्री वैष्णव म्हणाले.

वैष्णव यांनी त्यांच्या भाषणात देशातील आर्थिक प्रगतीची माहिती देखील दिली. मोदी सरकारच्या काळात देशातील सामाजिक क्षेत्रात झालेली गुंतवणूक, भौतिक आणि डिजिटल श्रेत्रातील पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक प्रगती आणि उत्पादन श्रेत्रातील प्रगतीची माहिती दिली.

गेल्या दहा वर्षात उत्पादन श्रेत्राला चांगली गती मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकांनी निरंतर प्रगतीवर विश्वास ठेवला असून, देश अशाच पद्धतीने प्रगती रत राहील असे, आश्वासन वैष्णव यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी एक जणाला अटक

NEET Exam: गोव्यातील चार हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्याची NSUI ची मागणी

Mining Transport: खनिज वाहतूकप्रश्‍नी सरकारला कानपिचक्या! कोर्टाने केल्या महत्वाच्या सूचना

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT