Cervical Cancer Vaccine Dainik Gomantak
देश

Cervical Cancer Vaccine: गर्भाशयाच्या कर्करोगावर स्वदेशी लस; सीरम इन्स्टिट्यूट आज करणार लाँच

India's First Cervical Cancer Vaccine: गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिली स्वदेशी लस तयार करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगानं मृत्यू होतो. पण या भयानक आजारावर मात करणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute) तयार केली आहे. गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटनं 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' ही स्वदेशी लस विकसित केली आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आज 1 सप्टेंबर रोजी ही लस लाँच करणार आहेत.

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने अलीकडेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस (Vaccine) तयार करण्यास परवानगी दिली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट आज लस लाँच करणार

मिळालेल्या माहितीनुसार स्वदेशी विकसित देशातील पहिली क्वाड्रिवेलेंट ह्यूमन पॅपिलोमावायरस वॅक्सीन (qHPV) गुरुवारी म्हणजेच, आज लाँच केली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि बायोटेक्नॉलॉजी विभागानं 1 सप्टेंबर रोजी गर्भाशयाच्या कर्करोगावरील उपचारासाठी स्वदेशी लस विकसित करण्याची योजना आखली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटच्या qHPV लसीला DCGI कडून 12 जुलै रोजी मार्केट ऑथरायझेशन मिळाले होते. सध्या या आजारावरील लस भारत (India) सध्या परदेशातून आयात करतो. त्यामुळे त्यासाठी जास्त खर्च येतो. आता ही लस भारतात उपलब्ध झाल्यामुळे लसीवरील खर्च कमी होणार असुन रुग्णांना अगदी सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

काय आहे सर्वाइकल कॅन्सर?

सर्वाइकल कॅन्सर हा कर्करोगाचा एक प्रकार आहे. जो गर्भाशयाच्या ग्रीवाच्या पेशींमध्ये होतो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) म्हणजे, लैंगिक संक्रमित संसर्ग आहे. हा विषाणू गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरतो. या कर्करोगावरील प्रभावी लस वय वर्ष नऊ ते 14 वयोगटातील मुलींना दिली जाऊ शकते, असं सांगितलं जात आहे.

लक्षणे

योनीतुन अस्वाभाविकरित्या रक्तस्त्राव होणे

खूप जास्त रक्तस्त्राव होणे.

‎गर्भाशयातील विकृतीयुक्त स्त्राव योनीतून येणे

लैंगिक संबंधानंतर किंवा तपासणी केल्यावर रक्तस्त्राव होणे

‎रजोनिवृत्तीनंतरही स्त्राव होणे

भूक कमी होणे, ओटीपोटात दुखणे, वजन कमी होणे, कंबर-पाय दुखणे यासारखी लक्षणेही जाणवू शकतात.

लस गर्भाशयाच्या कर्करोगावर प्रभावी

भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाचे (Cervical Cancer) प्रमाण वाढले आहे. एका अहवालानुसार, 15 ते 44 वयोगटातील महिलांमध्ये हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात उपयुक्त असल्याचं सांगितलं जातं. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत या लसीचा समावेश केल्यास महिलांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाची समस्या कमी करण्याच्या दिशेनं एक ठोस पाऊल ठरू शकतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT