Wheat exports Dainik Gomantak
देश

भारत लवकरच गहू निर्यात करणार ?

रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या किंमतीत तफावत वाढली

दैनिक गोमन्तक

गेले काही दिवस गहू आयात - निर्यातीवरुन विरोधी पक्षांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. गव्हाची किंमतीवरुन देशभरात गदारोळ झाल्याचं बऱ्याचदा समोर आले आहे. केंद्र सरकार ही गहू दरावरुन विचार करत होते. या पार्श्वभूमीवर भारत लवकरच सुमारे 1.2 मिलियन टन गहू निर्यात करण्यास मान्यता देऊ शकतो, अशी चर्चा आहे. तत्पूर्वी, भारत सरकारने गेल्या महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गहू बंदरांवर जमा झाला आहे. (India to export wheat soon )

एका वृत्तवाहीनीने दिलेल्या माहितीनुसार, 1.2 मिलियन टन गव्हाच्या निर्यातीला मंजुरी मिळाल्यानंतरही सुमारे 500,000 टन गहू बंदरांमध्ये राहू शकतो. अजूनही काही व्यापाऱ्यांना निर्यातीचे परवाने मिळू शकलेले नाहीत. निर्यातबंदीनंतर भारताने 469,202 टन गहू पाठवण्यास परवानगी दिली आहे. परंतु किमान 1.7 मिलियन टन गहू अजूनही बंदरांवर पडून आहे, ज्याचे पावसामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये गव्हाच्या दर्जाबाबत चिंता वाढली आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे तफावत वाढली

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात गव्हाची मागणी आणि पुरवठा यातील तफावत वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात युरोपियन युनियन (EU) गव्हाची किंमत सुमारे 43 रुपये प्रति किलो आहे. तर भारतीय गहू 26 रुपये किलो दराने विकला जात आहे. दोन्हीमध्ये 17 रुपये किलोचा फरक आहे. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल 2021 च्या तुलनेत भारताने वर्षभरात पाचपट अधिक गव्हाची निर्यात केली आहे. एप्रिल 2022 मध्ये भारताने 14.5 लाख टन गहू निर्यात केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

SCROLL FOR NEXT