India Defense Production Reaches 1.78 Lakh Crore Dainik Gomantak
देश

भारताने रचला नवा इतिहास! संरक्षण उत्पादनाने गाठला 1.78 लाख कोटींचा सर्वकालिक उच्चांक; स्वदेशी लष्करी ताकदीचा जागतिक डंका

Annual Defense Production Record 1.78 Lakh Crore: 'आत्मनिर्भर भारत' अभियान आणि संरक्षण क्षेत्रात स्वदेशी निर्मितीला चालना देण्याच्या मोहिमेला देशात एक अभूतपूर्व यश आले असून भारताने संरक्षण क्षेत्रात एक नवा इतिहास रचला.

Manish Jadhav

Annual Defense Production Record 1.78 Lakh Crore: 'आत्मनिर्भर भारत' अभियान आणि संरक्षण क्षेत्रात स्वदेशी निर्मितीला चालना देण्याच्या मोहिमेला देशात एक अभूतपूर्व यश आले असून भारताने संरक्षण क्षेत्रात एक नवा इतिहास रचला. चालू आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचे (India) वार्षिक संरक्षण उत्पादन 1.78 लाख कोटी रुपयांच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले. हा आकडा भारताची वाढती लष्करी ताकद आणि देशांतर्गत उत्पादन क्षेत्राचा वाढता दबदबा स्पष्टपणे दर्शवतो.

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘एक्स’वर एक खास पोस्ट शेअर केली. त्यांनी भारताच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि कार्यक्षम नेतृत्वाची विशेष प्रशंसा केली.

संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या वर्षीच्या एकूण संरक्षण उत्पादनात मागील आर्थिक वर्ष 2024-25 च्या तुलनेत 15.6 टक्क्यांची उल्लेखनीय वाढ नोंदवली गेली. गेल्या वर्षी हा आकडा 1.54 लाख कोटी रुपये इतका होता, जो आता वाढून थेट 1.78 लाख कोटी रुपये झाला. जर आपण काही वर्षांपूर्वीची आकडेवारी पाहिली, तर आर्थिक वर्ष 2020-21 च्या तुलनेत आतापर्यंत यामध्ये तब्बल 110 टक्क्यांची प्रचंड वाढ झाली, कारण त्यावेळी देशाचे एकूण संरक्षण उत्पादन केवळ 84,643 कोटी रुपये इतके मर्यादित होते.

गेल्या एका दशकाचा म्हणजेच 10 वर्षांचा आलेख पाहिला तर स्वदेशी संरक्षण उत्पादनात तब्बल चार पटीने वाढ झाली. वर्ष 2013-14 मध्ये भारताचे संरक्षण उत्पादन अवघे 43,746 कोटी रुपये होते, जे आता एका नव्या उंचीवर पोहोचले.

या ऐतिहासिक यशामध्ये सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून मोलाचे योगदान दिले. एकूण उत्पादनात सरकारी क्षेत्रातील संरक्षण सार्वजनिक उपक्रमांचा (DPSUs) वाटा 54.84 टक्के राहिला, तर दुसरीकडे खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनीही 45.16 टक्क्यांचे मोठे योगदान देत आपली ताकद दाखवून दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण उत्पादन विभागासह सरकारी आणि खाजगी क्षेत्राच्या सामूहिक प्रयत्नांना या मोठ्या यशाचे खरे मानकरी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, ही प्रगती देशातील वाढत्या संरक्षण औद्योगिक पायाचा थेट पुरावा आहे. सरकारच्या सातत्यपूर्ण धोरणात्मक सहकार्यामुळे, नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे आणि वेगाने वाढणाऱ्या संरक्षण निर्यातीमुळे आगामी वर्षांतही हे क्षेत्र याच गतीने पुढे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Prepaid Smart Meters: प्रीपेड स्मार्ट मीटर जोडणी कायमस्वरुपी बंद करा! अमित पाटकरांचा वीज खात्याला 15 दिवसांचा अल्टीमेटम

Margao October Heatwave: मडगावकरांचा ऑक्टोबर हिटने काढला घाम! पारा 37.7 अंशांवर, अवघ्या दोन तास चाळीस मिनिटांत तापमानात तीन अंशांची वाढ

8th Pay Commission: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ८व्या वेतन आयोगाचे 5 महत्त्वाचे अपडेट्स; पगारवाढीचा अंतिम निर्णय कधी होणार?

Goa Politics: 'वीरेश बोरकरांनी चोडणकरांकडून तीन कोटी घेतले', अजय खोलकरांच्या आरोपाने गोव्यात खळबळ; 'आरजी'तील अंतर्गत कलह विकोपाला

Kannada Remark Controversy: मुख्यमंत्र्यांच्या 'कानडी' वक्तव्यावरुन कुठ्ठाळीत रणकंदन; भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप! मारियानो रॉड्रिग्ज आक्रमक

SCROLL FOR NEXT