Indian Tibetan Army (India - China)  Siddhesh Shirsat / Dainik Gomantak
देश

India - China: चीन तिबेटमधून रचत आहे भारताविरुद्ध षडयंत्र

तिबेटमधील युवकांना सैन्यात करत आहे शामिल (India - China)

Siddhesh Shirsat

लाइन ऑफ ऍक्चुअल कंट्रोल (LAC) वर लष्करी तैनाती मजबूत करण्यासाठी चीनने (China) एक नवीन चाल योजली आहे. त्यासाठी चीनने तिबेट (Tibet) मधील प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला पीपल्स लिबरेशन आर्मीला (PLA) शामिल घेण्याचे ठरवले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिबेटीयन युवकांना (Tibetan youth) पीएलए मध्ये सामील करण्यापूर्वी त्यांची लॉयलटी टेस्ट केली जात आहे. चीन एलएसीच्या बाजूने, विशेषत: लडाख (Laddakh) आणि अरुणाचल प्रदेशसारख्या (Arunachal Pradesh) असामान्य हवामान असलेल्या क्षेत्रात आपली सैन्य शक्ती (Army Power) मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सरकारी सूत्रांनी म्हणण्यानुसार, "चिनी लष्कराने (Chines Army) तिबेटी लोकांच्या निष्ठावंत कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला सामील करण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला आहे." हे सैनिक स्थायी पद्धतीने एलएसी वर तैनात केले जाणार आहेत. (India - China)

सूत्रांनी दिलेल्या गुप्तचरांच्या माहिती नुसार, चिनी सैन्य एलएसी च्या बाजूने विशेष ऑपरेशन करण्यासाठी तिबेटी तरुणांची भरती करत आहे. तिबेटी तरुणांना अनेक लॉयलटी टेस्ट उत्तीर्ण केल्यानंतर चीनी सैन्यात समाविष्ट केले जात आहे, ज्यात त्याना चिनी भाषा शिकणे, चीनी कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व स्वीकारणे (सीसीपी) यांचा समावेश आहे. सदर भरती ही यावर्षीच्या जानेवारी फेब्रुवारी मध्ये सुरू झाली होती. चीनच्या लक्षात आले की तिबेट वासियांची भारतीय सेनेमधील स्पेशल फ्रंटियर फोर्सेस मध्ये सेवेची कामगिरी खूप चांगली आहे तसेच लद्दाख सारख्या क्षेत्रामध्ये तिबेटी सैनिक खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात. याच गोष्टीचा फायदा घेणयासाठी चीन ही चाल खेळात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT