Ishan Kishan Dainik Gomantak
देश

Ind A vs SA A: सलामीवीर ढेपाळले, मधल्या फळीनेही हात टेकले, आफ्रिकेने टीम इंडियाला 73 धावांनी चारली पराभवाची धूळ; क्लीन स्वीपचे स्वप्न भंगले! VIDEO

South Africa A Beat India A 3rd ODI: टीम इंडियाला केवळ कसोटी मालिकेतच नव्हे, तर 'ए' संघांच्या स्तरावरही दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला.

Manish Jadhav

South Africa A Beat India A 3rd ODI: टीम इंडियाला केवळ कसोटी मालिकेतच नव्हे, तर 'ए' संघांच्या स्तरावरही दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. भारत 'ए' आणि दक्षिण आफ्रिका 'ए' यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या पराभवानंतरही भारताने ही तीन सामन्यांची मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली. या सामन्यात ईशान किशन आणि आयुष बडोनी यांनी केलेली अर्धशतकी खेळीही संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

साउथ आफ्रिकेची मोठी धावसंख्या

वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय 'ए' संघाने शानदार विजय मिळवत मालिका आधीच खिशात घातली होती. मात्र, तिसरा सामना जिंकून क्लीन स्वीप करण्याची भारताची इच्छा अपूर्णच राहिली. तिसऱ्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका 'ए' संघाने 50 षटकांत 6 गडी गमावून 325 धावांचा डोंगर उभा केला.

भारतासमोर 326 धावांचे मोठे आव्हान होते. दक्षिण आफ्रिकेसाठी दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी उत्कृष्ट शतकी खेळी केली. लुआन-ड्रे प्रीटोरियसने 98 चेंडूंत 123 धावा (9 चौकार, 6 षटकार) फटकावल्या. दुसऱ्या सलामीचा फलंदाज रिवाल्डो मूनसामीने 130 चेंडूंत 107 धावांची (13 चौकार, 2 षटकार) महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या दोघांच्या भागीदारीमुळेच आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारता आली.

भारतीय फलंदाजांचे अपयश

भारतासमोर 326 धावांचे आव्हान होते, पण सलामीचा फलंदाज अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाल्यामुळे हे आव्हान अधिक कठीण झाले. अभिषेक शर्माने 8 चेंडूंत केवळ 11 धावा केल्या. यानंतर तिलक वर्मा, रियान पराग आणि ऋतुराज गायकवाड यांनाही फार मोठी खेळी खेळता आली नाही. मधल्या फळीत ईशान किशन आणि आयुष बडोनी यांनी नक्कीच संघाला विजयाची आशा दाखवली. ईशानने 67 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. आयुष बडोनीने 66 चेंडूंत 8 चौकारांच्या साहाय्याने 66 धावा केल्या. या दोघांच्या अर्धशतकानंतरही ते संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकले नाहीत. हे दोघेही बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या.

73 धावांनी पराभव

भारतीय 'ए' संघाने 49.1 षटकांत सर्व गडी गमावून केवळ 252 धावा केल्या. परिणामी, भारताला हा सामना 73 धावांनी गमवावा लागला. या पराभवानंतरही भारताने पहिली दोन एकदिवसीय सामने जिंकल्यामुळे मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली. या मालिकेतून भारतीय युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभव मिळाला, पण फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत अधिक सुधारणा करण्याची गरज असल्याचे या सामन्यातून स्पष्ट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT