Jasprit Bumrah  Dainik Gomantak
देश

Asia Cup 2025 Final: फायनल सामन्यात पुन्हा राडा! पाकिस्तानी ओपनरवर भडकला 'जस्सी'; तुम्हीच बघा काय घडलं? VIDEO

Jasprit Bumrah And Sahibzada Farhan Fight: बुमराहच्या गोलंदाजीवर जोरदार पवित्रा घेतला आणि एक जबरदस्त षटकार ठोकला. या षटकारानंतर मैदानावरचे वातावरण लगेच तापले.

Manish Jadhav

Jasprit Bumrah & Sahibzada Farhan Fight: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 चा अंतिम सामना सध्या दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ केवळ 146 धावांतच तंबूत परतला. मात्र, कमी धावसंख्या असतानाही या सामन्यात पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरचे वातावरण गरम झाले. याचे कारण ठरले पाकिस्तानी सलामीवीर साहिबजादा फरहान आणि टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यातील जोरदार शाब्दिक चकमक.

षटकार मारताच बुमराह-फरहानमध्ये वाद

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर साहिबजादा फरहानने आक्रमक सुरुवात केली. त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर जोरदार पवित्रा घेतला आणि एक जबरदस्त षटकार ठोकला. या षटकारानंतर मैदानावरचे वातावरण लगेच तापले आणि फरहान व बुमराह यांच्यात शाब्दिक चकमक झाली, ज्यामुळे संपूर्ण स्टेडियममध्ये उत्साह वाढला. मात्र, प्रकरण अधिक वाढण्यापूर्वीच दोघेही एकमेकांपासून दूर झाले.

बुमराहविरुद्ध फरहानचा विश्वविक्रम

यंदाच्या आशिया कपमध्ये साहिबजादा फरहानचा फॉर्म जबरदस्त राहिला आहे. विशेषतः जसप्रीत बुमराहविरुद्ध त्याने तुफान फटकेबाजी केली. फरहानने बुमराहच्या गोलंदाजीवर आतापर्यंत 34 चेंडूत 51 धावा फटकावल्या आहेत, ज्यात 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बुमराहला त्याला या स्पर्धेत एकदाही बाद करता आले नाही. फरहानने बुमराहविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. बुमराहविरुद्ध तीन षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: चक दे इंडिया...! पाकड्यांना नमवत 'सूर्या ब्रिगेड'ने नवव्यांदा कोरलं आशिया चषकावर नाव, तिलक-शिवमने धू धू धूतलं

Asia Cup 2025 Final: फायनलमध्ये बुमराहचा स्वॅग! 'ती' विकेट घेऊन सेलिब्रेशनने काढला राग; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल VIDEO

Asia Cup 2025 Final: कुलदीप यादवनं रचला इतिहास! लसिथ मलिंगाचा मोडला मोठा रेकॉर्ड; पाकिस्तानी फलंदाजांना केलं ढेर VIDEO

जीवनात अडचणी येतायत? बृहस्पतीला करा प्रसन्न, होतील मनोकामना पूर्ण; सौभाग्य आणि समृद्धीसाठी करा 'हे' विशेष उपाय

India Tourism: भारत गरीब नाही, दुर्लक्षित...! 'या' खजिन्यामुळे भारत बनू शकतो जगातील पर्यटन महासत्ता; असं का म्हणाले जावेद अख्तर?

SCROLL FOR NEXT