Team India Dainik Gomantak
देश

IND vs ENG: भारतासाठी ओव्हल 'लकी' की 'अनलकी'? कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? गिल सेना करणार मोठा चमत्कार

Team India Test Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 'अँडरसन-तेंडुलकर' कसोटी मालिका आता रोमांचक वळणावर येऊन थांबली आहे.

Manish Jadhav

Team India Test Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 'अँडरसन-तेंडुलकर' कसोटी मालिका आता रोमांचक वळणावर येऊन थांबली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतील आतापर्यंत चार सामने पूर्ण झाले आहेत, ज्यात इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. या रोमांचक मालिकेतील अंतिम सामना 31 जुलैपासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval, London) येथे खेळला जाईल. हा सामना भारतासाठी जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण मालिका बरोबरीत आणण्याची ही शेवटची संधी असेल. मात्र, या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड चिंताजनक राहिला आहे, ज्यामुळे हा मुकाबला आणखी आव्हानात्मक होण्याची शक्यता आहे.

ओव्हलमध्ये भारताचा प्रवास: निराशाजनक आकडेवारी

भारताने केनिंग्टन ओव्हल मैदानावर आतापर्यंत एकूण 15 कसोटी सामने (Test Matches) खेळले आहेत. यापैकी 14 सामने भारत (India) आणि इंग्लंड यांच्यात खेळले गेले, तर एक सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. या 15 सामन्यांपैकी भारताला केवळ दोन वेळा (Two Wins) विजय मिळवता आला आहे, तर सहा वेळा (Six Losses) पराभवाचा सामना करावा लागला आहे. उर्वरित सात सामने अनिर्णित (Draw) राहिले आहेत. ही आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की, हे मैदान भारतासाठी कधीही सोपे राहिलेले नाही.

दरम्यान, या मैदानावर भारताने आपला पहिला कसोटी सामना ऑगस्ट 1936 मध्ये खेळला होता, ज्यात इंग्लंडने भारताचा 9 गडी राखून पराभव केला होता. यानंतर, 1946 आणि 1952 मधील सामने अनिर्णित राहिले, पण 1959 मध्ये भारताला एक डाव (Innings) आणि 27 धावांनी (27 Runs) दारुण पराभव पत्करावा लागला.

भारताला ओव्हल मैदानावर पहिला ऐतिहासिक विजय (First Historic Win) 1971 मध्ये मिळाला होता. हा विजय भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्णक्षणांमध्ये गणला जातो. अजित वाडेकर (Ajit Wadekar) यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला (England) 4 गडी राखून हरवून परदेशी भूमीवर आपला पहिला मोठा कसोटी विजय नोंदवला होता. हा विजय त्यावेळी भारतीय क्रिकेटसाठी मैलाचा दगड (Milestone) ठरला होता.

मात्र, 1979 पासून 2007 पर्यंत भारताने येथे पाच कसोटी सामने खेळले, जे सर्व अनिर्णित राहिले. या वर्षांमध्ये भारताने संघर्ष केला, पण विजयापासून दूर राहिला. यानंतर 2011 मध्ये पराभवाचा एक लांबच लांब सिलसिला सुरु झाला, जेव्हा इंग्लंडने भारताला एक डाव आणि 8 धावांनी हरवले. 2014 मध्ये भारताला पुन्हा एक डाव आणि 244 धावांनी पराभव पत्करावा लागला, जो त्यावेळी त्याच्या सर्वात मोठ्या पराभवांपैकी एक होता. 2018 मध्येही भारताला 118 धावांनी पराभव पत्करावा लागला.

WTC फायनलची निराशा

तरीही, 2021 मध्ये भारताने ओव्हल मैदानावर आपला सर्वोत्तम प्रदर्शन करत इंग्लंडला 157 धावांनी (157 Runs) पराभूत केले. हा विजय भारतीय संघासाठी या मैदानावर आतापर्यंतची सर्वात मोठी जिंक होती. त्या सामन्यात गोलंदाज (Bowlers) आणि फलंदाज (Batsmen) दोघांनीही शानदार प्रदर्शन केले होते, ज्याने भारताच्या आत्मविश्वासाला (Confidence) नवी ऊर्जा दिली.

पण, जुलै 2023 मध्ये भारताने ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना खेळला. मात्र, या विजेतेपदाच्या सामन्यात भारताला 209 धावांनी पराभव पत्करावा लागला आणि ओव्हलमध्ये आणखी एक निराशाजनक विक्रम भारताच्या नावावर नोंदवला गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Goa Live News: "गोव्यातील माटोळी विक्रेत्यांकडून सोपो वसूल करू नये" मुख्यमंत्री

Sanquelim Road Issue: देसाईनगर साखळीतील रस्ता बनला धोकादायक; तातडीने डागडुजीची करण्याची रहिवाशांची मागणी

Panjim: मांडवी किनाऱ्यावरील अष्टमीच्या फेरीला जत्रेचे स्वरूप, सुटीमुळे खरेदीसाठी उडाली झुंबड

SCROLL FOR NEXT