Rohit Sharma Dainik Gomantak
देश

IND vs AUS 3rd ODI: शाहिद आफ्रिदीचा 10 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! 'हिटमॅन' ठरणार वनडेचा सिक्सर किंग; मारावे लागणार फक्त 'इतके' षटकार

Rohit Sharma Record: रोहित सध्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Manish Jadhav

Rohit Sharma Record: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा मोठी खेळी खेळू शकला नाही, पण दुसऱ्या सामन्यात त्याने दमदार फलंदाजी करत फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बाकी आहे. जर रोहितने आपला 'हिटमॅन' अवतार दाखवला, तर तो क्रिकेटमधील एक अत्यंत मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर करु शकतो, जो सध्या पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याच्या नावावर आहे.

आफ्रिदीच्या विक्रमावर रोहितचे लक्ष्य

वनडे (ODI) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम सध्या शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afridi) नावावर आहे. आफ्रिदीने आपल्या कारकिर्दीत 398 वनडे सामने खेळून 351 षटकार मारले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये 350 हून अधिक षटकार मारणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. आफ्रिदीने 2015 मध्ये वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, म्हणजेच हा विक्रम सुमारे 10 वर्षे अबाधित आहे. आता रोहित शर्मासमोर (Rohit Sharma) हा विक्रम मोडण्याचे लक्ष्य असेल.

रोहित फक्त 6 षटकार मागे

रोहित सध्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 275 वनडे सामन्यांमध्ये 346 षटकार लगावले आहेत. याचा अर्थ, त्याला आफ्रिदीला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी केवळ 6 षटकारांची आवश्यकता आहे. 6 षटकार मारताच रोहित शर्मा नवा विश्वविक्रम करेल. तो जर आणखी 4 षटकार मारले, तर 350 षटकार पूर्ण करणारा तो जगातील दुसरा फलंदाज बनेल, आणि 5 षटकार मारल्यास तो आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी करेल.

दुसऱ्या वनडेत दमदार खेळी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने धमाकेदार फलंदाजी केली. त्याने 97 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 2 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 73 धावांची शानदार खेळी खेळली. मोठी धावसंख्या करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला, पण या खेळीमुळे तो आफ्रिदीच्या विक्रमाच्या आणखी जवळ पोहोचला. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बाकी आहे. रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतलेला असताना जर त्याने या सामन्यात मोठी आणि तुफानी खेळी केली, तर शाहिद आफ्रिदीचा सुमारे 10 वर्षांपूर्वीचा हा विश्वविक्रम मोडला जाणे जवळपास निश्चित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT