Tihar Jail, Delhi. Dainik GOmantak.
देश

Tihar Jail Crime : तिहार कारागृहात पुन्हा रक्तरंजित खेळ; कैद्यांचा एकमेकांवर चाकूने हल्ला

दिल्लीच्या तिहार तुरुंगात पुन्हा एकदा दोन कैद्यांमध्ये हाणामारी झाली. एका कैद्याने दुसऱ्यावर धारदार चाकूने हल्ला. दोन्ही कैद्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Tihar Jail News

दिल्लीतील तिहार तुरुंगातील रक्तरंजित खेळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सोमवारी पुन्हा एकदा दोन कैद्यांमध्ये हाणामारी झाली. एका कैद्याने दुसऱ्यावर धारदार चाकूने हल्ला केला. दोन्ही गटातील सदस्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तिहार तुरुंगाशी संलग्न असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सेंट्रल जेल क्रमांक 1 मध्ये दोन गटातील दोन कैद्यांमध्ये मारामारी झाली. आलोक या कैद्याने राहुलवर धारदार चाकूने हल्ला केला. या हाणामारीत दोन्ही कैद्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन्ही कैद्यांना गंभीर गुन्ह्यांसाठी अटक केले असून त्याचा तपास सुरू आहे. तिहार तुरुंगात रविवारी या कैद्यांमध्ये बाचाबाची झाली आणि सोमवारी त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघेही वेगवेगळ्या टोळ्यांशी संबंधित आहेत. तिहार तुरुंगात कैद्यांनी एकमेकांवर धारदार चाकू आणि सुईने हल्ला केला. या घटनेनंतर कारागृहात खळबळ उडाली आहे.

तिहार कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी मध्यरात्री १२.३८ वाजता तिहार कारागृहातील मध्यवर्ती कारागृह क्रमांक १ (वॉर्ड क्रमांक २) मध्ये काही कैद्यांनी ट्रायल कैदी राहुल उर्फ ​​पवन याच्यावर चाकूने आणि फरशीने हल्ला केला, त्यामुळे कैदी जखमी झाला.

याआधी 2 मे 2023 रोजी गुंड टिल्लू ताजपुरियाची जितेंद्र गोगी टोळीच्या सदस्यांनी तिहारच्या उच्च सुरक्षा कक्षात सुईने वार करून हत्या केली होती. या घटनेचे दोन व्हिडिओही समोर आले आहेत. मारेकऱ्यांनी पोलिसांसमोर टिल्लूवर सुईने वार केले. या प्रकरणी पोलिसांनी योगेश टुंडा, दीपक डबास, राजेश बवाना, रियाझ खान, चवन्नी आणि अता उर रहमान या सहा आरोपींना अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT