Israel's Envoy in India threaten to leave India Dainik Gomantak
देश

The Kashmir Files Row: इस्त्रायलच्या राजदुतांना भारत सोडण्याची धमकी, 'इफ्फी'तील वक्तव्याचे पडसाद

ट्विटरवरील मेसेजमध्ये ज्युंना मारणाऱ्या हिटलरचे केले कौतूक

Akshay Nirmale

The Kashmir Files Row: 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात आता भारतातील इस्त्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांना तत्काळ देश सोडण्याची धमकी मिळाली आहे. त्यांनी ट्विटरवर एका मेसेजचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. त्यात हिटलर महान होता, त्याने तुमच्यासारख्या घाणीला जाळून मारले, तत्काळ भारत सोडा, अशी धमकी त्या मेसेजमधून देण्यात आली आहे.

(Israel's Envoy in India threaten to leave India)

गिलोन यांनी सांगितले की, हा धमकीचा मेसेज त्यांना ट्विटरवर पाठविण्यात आला आहे. मेसेज पाठविणाऱ्याची काळजी असल्याने त्याची ओळख लपवत असल्याचेही गिलोन यांनी म्हटले आहे. दरम्यान, मेसेज पाठविणाऱ्याच्या प्रोफाईलमध्ये पीएच.डी. होल्डर असे लिहिले आहे.

गिलोन यांच्या या पोस्टरवर अनेक भारतीयांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर गिलोन यांनी आणखी एक ट्विट करत भारतीयांना धन्यवाद दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मागच्या ट्विटनंतर भारतभरातून पाठिंबा मिळत आहे. मला खूप आनंदी वाटत आहे. पुर्वीचा मेसेज शेअर करण्याचा उद्देश केवळ हाच होता की, लोकांमध्ये आजही ज्यु विरोधी भावना आहेत. आपल्याला मिळून याचा विरोध करायला हवा.

इजरायलचे फिल्ममेकर नादव लेपिड यांनी गोव्यात झालेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवामध्ये (IFFI) समारोपावेळी बोलताना 'द काश्मीर फाइल्स' हा एक प्रोपगंडा असलेला आणि अभद्र चित्रपट असल्याचे म्हटले होते. ते इफ्फीमध्ये ज्युरी म्हणून सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. त्यानंतर गिलोन यांनी ट्विटवरवरून एक ओपन लेटर लिहित भारतीयांची माफी मागितली होती. लॅपिड यांचे वक्तव्य लाजिरवाणे होते. ते वक्तव्य असंवेदनशील आणि गर्व असलेले आहे. त्यांना लाज वाटायला हवी होती. त्यांच्या वक्तव्याबद्दल मी माफी मागतो, असे त्यांनी म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT