In Gujarat, brother stabbed younger sister out of superstition, spent 24 hours with dead body. Dainik Gomantak
देश

"ती जगली तर संपूर्ण कुटुंब संपेल" अंधश्रद्धेतून भावाचे धाकट्या बहिणीवर चाकूने वार, मृतदेहासोबत घालवले 24 तास

Gujarat Crime News: नवरात्रीनिमित्त तरुण आणि त्याच्या बहिणीने माताजीच्या पाठाचे आयोजन केले होते. यावेळी धार्मिक विधीच्या नावाखाली मोठ्या भावाने व बहिणीने धाकट्या बहिणीला शारदाबेनला (१५ वर्षे) पलंगावर झोपवले.

Ashutosh Masgaunde

In Gujarat, brother stabbed younger sister out of superstition, spent 24 hours with dead body:

गुजरातमधील राजकोटमध्ये भाऊ आणि बहिणीने मिळून लहान बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येमागील अंधश्रद्धा हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. जामनगर जिल्ह्यातील ध्रोल तालुक्यातील हजामचोरा गावात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्येचा आरोप असलेल्या भाऊ आणि बहिणींनी आपल्या 15 वर्षांच्या लहान बहिणीची हत्या केली कारण त्यांना भीती होती की, जर त्यांची लहान बहीण जिवंत राहिली तर त्यांच्या कुटुंबातील लोकांचा अकाली मृत्यू होईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ ऑक्टोबर रोजी घडली आहे. आरोपी भाऊ-बहिणीने हा गुन्हा केला.

मात्र, आरोपी राकेश आणि त्याची मोठी बहीण सविता यांची बदललेली वागणूक एका व्यक्तीच्या लक्षात आल्याने ही उटना उघडकीस आली.

पोलिसांनी संशयाच्या आधारे आरोपी भाऊ-बहिणीला ताब्यात घेतले

यातील आरोपी भाऊ ध्रोळ तालुक्यातील ध्रोळ गावात दोन लहान बहिणींसह मोलमजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

गेल्या 16 ऑक्टोंबरला नवरात्रीनिमित्त तरुण आणि त्याच्या बहिणीने माताजीच्या पाठाचे आयोजन केले होते. यावेळी धार्मिक विधीच्या नावाखाली मोठ्या भावाने व बहिणीने धाकट्या बहिणीला शारदाबेनला (१५ वर्षे) पलंगावर झोपवले.

यानंतर राकेश आणि त्याच्या बहिणीने चाकूने वार केले. हा भाऊ इथेच थांबला नाही. त्याने धाकट्या बहिणीला खोलीबाहेर ओढत शेडमधील लोखंडी भिंतीसमोर नेले. त्यानंचरही तिच्या डोक्यावर चाकूने अंदाधुंद वार करून खून करण्यात आला. त्यामुळे शारदाबेनचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची ते ज्याच्या शेतात काम करत होते त्या मालकाला समजताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. ध्रोळ पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

शेतमालक बिपीनभाई गोपालभाई बरैया यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला. पोलिसांनी राकेशला ताब्यात घेतले आहे. दुसरी आरोपी अल्पवयीन असून, तिला बाल संरक्षण गृहात पाठवण्याची तयारी सुरू आहे.

आरोपींनी 24 तास मृतदेहाबरोबर घालवले

जामनगरचे एसपी प्रेमसुख देलू यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रीच्या वेळी धार्मिक विधीच्या नावाखाली खोलीत पाठ केल्यानंतर भावाने बहिणीची निर्घृण हत्या केली.

मृतदेह २४ तास खोलीत पडून होता. त्यावेळी दोन्ही आरोपीही मृतदेहापाशी बसून होते. नवरात्रीमध्ये पूजा केल्यानंतर दुसऱ्या आरोपी बहिणीने भावाला सांगितले होते की, आपल्या लहान बहिणीचे विधी करावे लागतील, अन्यथा आपले मोठे नुकसान होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT