In Faridabad's 'Omax Residency Society', 8-year-old Boy Got Stucked in the Lift for three hours. Dainik Gomantak
देश

Viral : 8 वर्षाचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला, वेळेचा केला असा वापर; युजर्स म्हणाले, IAS साठी असंच...

ओमॅक्स रेसिडेन्सी सोसायटीतील लिफ्टमध्ये सुमारे तीन तास एक 8 वर्षांचा मुलगा अडकला होता. या आणीबाणीच्या परिस्थितीत त्याने घाबरण्याऐवजी, लिफ्टमध्ये बसून शाळा आणि ट्यूशनचा अभ्यास पूर्ण केला.

Ashutosh Masgaunde

In Faridabad's 'Omax Residency Society', 8-year-old Boy Got Stucked in the Lift for three hours:

लिफ्टमध्ये अडकणे हा बर्‍याच लोकांसाठी भयानक अनुभव असतो. 5 ते 10 मिनिटेही लिफ्टमध्ये अडकल्याने भीतीचे वातावरण निर्माण होते.

आता फरिदाबादच्या सोसायटीतून असाच एक प्रकार समोर आला आहे, जे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर, फरिदाबादच्या 'ओमॅक्स रेसिडेन्सी सोसायटी'मध्ये शनिवारी संध्याकाळी एक 8 वर्षांचा मुलगा सुमारे तीन तास लिफ्टमध्ये अडकला होता.

पण मुलगा घाबरला नाही. त्याने डोके शांत ठेवले. त्याने लिफ्टमध्ये आरामात बसून शाळा आणि ट्यूशन दोन्हीचा अभ्यास पूर्ण केला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

या घटनेतील मुलगा पाचव्या मजल्यावर राहतो. तो रविवारी संध्याकाळी 5 वाजता ट्यूशनसाठी गेला होता. तो दररोज 6 वाजेपर्यंत घरी परततो. मात्र त्या दिवशी तो 7 वाजेपर्यंतही परत न आल्याने कुटुंबीयांनी ट्यूशनच्या ठिकाणी चौकशी केली. तेव्हा तो ट्यूशनला गेला नसल्याचे समजले.

नातेवाईकांनी मुलाचा शोध सुरू केल्यानंतर सायंकाळी ५ वाजल्यापासून लिफ्ट बंद असल्याची माहिती मिळाली. आपले मूल लिफ्टमध्ये कुठेतरी अडकले असावे, अशी शंका त्यांना आली. आणि त्यांचा अंदाज खरा ठरला लिफ्ट उघडल्यावर तो चिमुकला त्यातून बाहेर पडला.

मुलाने सांगितले की जेव्हा लिफ्ट थांबली तेव्हा तो मदतीसाठी जोरा जोरात ओरडला तसेच आणि इमर्जेंन्सी बटण देखील दाबले. पण कोणीच आले नाही.

अशा स्थितीत मुलाने न घाबरता अभ्यास करायला सुरुवात केली. मात्र, लिफ्ट 2 तासांहून अधिक काळ बंद राहिल्याने आणि कोणीही त्याची दखलही न घेतल्याने मुलाचे कुटुंबीय व इतर लोक सोसायटी व्यवस्थापनावर प्रचंड संतापले.

इतक्या गंभीर परिस्थितीतही या मुलाने डोके शांत ठेवत अभ्यासाला महत्त्व दिले. या सर्व प्रकारावर सोशल मीडियावर मुलाचे कौतुक होत आहे.

यामध्ये ज्योती नावाची यूजर म्हणते, "आयएएस होण्यासाठी इतके डेडिकेशन पाहिजे."

दुसर्‍याने लिहिले, "हे ट्विट माझ्या पालकांना पाहण्याआधी डिलीट करा. अशाच प्रकारे आणखी एक यूजर म्हणाला, "अशा लोकांमुळे आमचे आयुष्य खराब झाले आहे"!

फरिदाबादध्येही असाच प्रकार

दुसरे प्रकरण फरिदाबादच्या SRS निवासी सोसायटीचे आहे. सोसायटीच्या C7 टॉवरमधील फ्लॅट क्रमांक 406 मध्ये राहणारे विकास श्रीवास्तव यांनी सांगितले की, त्यांची 11 वर्षांची मुलगी स्नेहा जी सहावीत शिकते ती रविवारी संध्याकाळी लिफ्टमध्ये अडकली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

C K Nayudu Trophy: गोव्याला मोठा फटका! पहिल्याच लढतीत पराभव; झारखंडचा 113 धावांनी एकतर्फी विजय

T20 Cricket Tournament: शेवट गोड! गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंची दिवाळी, आसामवर केली मात

Goa Politics: "हे 33 नरकासुर गोवा जाळतील", श्रीकृष्ण विजयोत्सवात विरोधी पक्षांची वज्रमुठ; सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान?

Quelossim: समुद्र किनाऱ्यावर भरला ‘दिवाळी बाजार’! केळशी पंचायतीचा अभिनव उपक्रम; स्थानिकांसह पर्यटकांनीही घेतला लाभ

Mandrem Accident: भरधाव ट्रकची स्कुटरला धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; पुराव्यांअभावी चालकाची निर्दोष सुटका

SCROLL FOR NEXT