couple celebrated their wedding anniversary in the guise of bride and groom amid piles of dirt and garbage on the road. X, @harikantsharmaG
देश

Viral Video: जोडप्याने लग्नाचा वाढदिवस गटारीत का साजरा केला? कारण वाचून बसेल धक्का

Agra Couple: रस्त्यावर धूळ आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये एका जोडप्याने त्यांचा 17वा लग्नाचा वाढदिवस वधू-वराच्या वेशात साजरा केला. यासह दोघांनीही गलिच्छ आणि दुर्गंधीयुक्त गटारीत फोटो काढले.

Ashutosh Masgaunde

In Agra city in Uttar Pradesh, a couple celebrated their wedding anniversary in the guise of bride and groom amid piles of dirt and garbage on the road:

उत्तर प्रदेशातील आग्रा शहरातील नागला काली भागात रस्त्यावर धूळ आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये एका जोडप्याने त्यांचा 17वा लग्नाचा वाढदिवस वधू-वराच्या वेशात साजरा केला. यासह दोघांनीही गलिच्छ आणि दुर्गंधीयुक्त गटारीत फोटो काढले.

अस्वच्छता आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या दाम्पत्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

यावेळी जोडप्याने एकमेकांना पुष्पहार घातला, तेव्हा या जोडप्याने हातात एक फलक धरले होते. या फलकांवर 'रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम नीट केले नाही तर मतदान करणार नाही' असे लिहिले होते.

गेल्या 15 वर्षांपासून ही समस्या कायम असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे, मात्र गेल्या आठ महिन्यांत या रस्त्याचे रुपांतर अस्वच्छ नाल्यात झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे.

या रस्त्यावरून ३० हून अधिक वसाहतीतील लोक ये-जा करतात. अस्वच्छतेमुळे स्थानिकांना दुसऱ्या मार्गाने जाण्यासाठी दोन किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे.

परिसरातील डझनभर वसाहतींच्या बाहेर 'विकास नाही, मत नाही' असे पोस्टर्सही लावले गेले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

रहिवाशांनी तक्रार करूनही लोकप्रतिनिधींनी कोणतीही कारवाई न केल्याने भगवान शर्मा आणि त्यांच्या पत्नी उमा शर्मा यांनी हे अनोखे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

भगवान शर्मा म्हणाले की, आम्ही गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहोत. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे गेलो. कारवाई न झाल्याने आम्हाला अशा पद्धतीने आंदोलन करावे लागले. हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर उजेडात आणण्यासाठी हा निषेध असल्याचे उमा शर्मा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT