Tribute to freedom fighters from young generation Dainik Gomantak
देश

Video: महात्मा गांधीपासून एपीजे अब्दुल कलामांपर्यंतच्या वीरांना भावी पिढीकडून अनोखी श्रद्धांजली

X वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, लहान मुले महात्मा गांधी, एपीजे अब्दुल कलाम, भगतसिंग, बिरसा मुंडा आणि इतर क्रांतिकारकांच्या रूपात त्यांच्या जीवनातील देखावे साकारत प्रेरणादायी संदेश देत आहेत.

Ashutosh Masgaunde

2023 वर्ष संपल्यानंतर आता आपण सर्वांनी नवीन वर्ष 2024 मध्ये पाऊल टाकले आहे. याच पार्श्वभूमीवर भारताच्या भावी पिढीने देशाचा इतिहास आणि नियतीला आकार देणार्‍या वीरांचे स्मरण केले.

X वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, लहान मुलांनी महात्मा गांधी, एपीजे अब्दुल कलाम, भगतसिंग, बिरसा मुंडा आणि इतर क्रांतिकारकांचा वेषभूषा करून त्यांच्या जीवनातील देखावे साकारले आणि प्रेरणादायक संदेश दिले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ब्रिटीश वसाहतवादाच्या विरोधात अहिंसक संघर्षाचे नेतृत्व केले. भारताचे मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांनी 11 वे राष्ट्रपती म्हणून काम केले आणि देशाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीत योगदान दिले.

क्रांतिकारी हुतात्मा भगतसिंग यांनी वयाच्या २३ व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. आदिवासी नेते बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या अत्याचार आणि आदिवासींच्या शोषणाविरुद्ध बंड केले.

मुलांनी सर्वांना नवीन वर्ष 2024 च्या शुभेच्छा देऊन आणि या वीरांच्या आदर्शांचे पालन करण्याचे आवाहन करून व्हिडिओचा शेवट केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Net Worth: लक्झरी लाईफस्टाईल, ब्रँड एंडोर्समेंटमधून कोट्यवधींची कमाई, आलिशान कारचं कलेक्शन; किंग कोहलीची नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क!

डिजिटल क्षेत्रात 'WISE' ची क्रांती! बातमी निर्मिती आता होणार 'सुपरफास्ट'; Oneindia ने विकसित केला नवा AI प्लॅटफॉर्म

पाकिस्तान जिंदाबाद फलक प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून सक्त करावाईचे आदेश, अवैध मद्य तस्करीबाबतही इशारा

कोहली म्हणाला, ''रुको, मार्कर लेके आता हूँ!'' 4 तास घराबाहेर बसलेल्या चाहत्यासाठी स्वतः धावला; किस्सा वाचून तुम्हीही म्हणाल, 'हाच खरा किंग'

Mhaje Ghar: 'हे सरकारचे ऐतिहासिक पाऊल'! विश्‍वजीत राणेंचे प्रतिपादन; वाळपईत ‘माझे घर’ योजनेचे अर्ज वाटप

SCROLL FOR NEXT