IIT Baba Match Prediction Dainik Gomantak
देश

India vs Pakistan: 'भारत हरणार' म्हणणारा IIT बाबा तोंडघशी, भविष्यवाणी ठरली खोटी, नेटिझन्सनी घेतली फिरकी

IIT Baba Match Prediction: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत केले.

Sameer Amunekar

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत केले. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर आयआयटीयन बाबा अभय सिंग सोशल मीडियावर खूपच ट्रोल होत आहे. त्याने सामन्यापूर्वी एक मोठी भविष्यवाणी केली होती.

भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यापूर्वी आयआयटीयन बाबांनी एक मोठी भविष्यवाणी केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागेल, असे त्यांनी म्हटले होते.

कोहली कितीही ताकद लाऊदेत, भारत कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकणार नाही असा दावा आयआयटी बाबाने केला होता.

पण भारत-पाकिस्तान सामन्या बाबतचा आयआयटीयन बाबाचा अंदाज चुकला. भारताने हा सामना जिंकला आणि विराट कोहलीनेही या सामन्यात एक दमदार शतकही झळकावले. आता भारतीय संघाच्या विजयानंतर बाबाला वाईटरित्या ट्रोल केले जात आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २४१ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून सौद शकीलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ६२ धावांची खेळी खेळली.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने केवळ ४२.३ षटकांत सामना जिंकला. किंग कोहलीने १११ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरने ५६ धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT