IIT Mandi Director Laxmidhar Behera Himachal Landslides Dainik Gomantak
देश

Video: 'मांस खाल्ल्याने भूस्खलन होत आहे...', IIT संचालकांच्या अजब वक्तव्याने नवा वाद

IIT Mandi Director Laxmidhar Behera: आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांनी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घेण्यास सांगितले.

Manish Jadhav

IIT Mandi Director Laxmidhar Behera Himachal Landslides: हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटना वारंवार घडत आहेत.

याला उत्तर देताना आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांनी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घेण्यास सांगितले.

हिमाचल प्रदेशात दरडी कोसळण्याच्या आणि ढगफुटीच्या घटना प्राण्यांवर होणाऱ्या क्रूरतेमुळे घडत असल्याचे त्यांनी एका चर्चासत्रात सांगितले. आयआयटी मंडीच्या संचालकांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

बेहरा म्हणाले की, “जर आपण प्राण्यांसोबत अशीच क्रूरता करत राहू तर हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) मोठे पतन होईल. प्राण्यांची हत्या थांबवा. तुम्ही निष्पाप प्राण्यांची हत्या करत आहात.

याचा पर्यावरणाशी संबंध आहे, परंतु या हत्या थांबवल्या नाहीतर याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील.'' विद्यार्थ्यांना संबोधित करताना बेहारा पुढे म्हणाले की, "वारंवार भूस्खलन, ढगफुटी आणि इतर अनेक गोष्टी घडत आहेत, हे सर्व प्राण्यांवरील क्रूरतेचा परिणाम आहे."

व्हिडिओ व्हायरल झाला

दरम्यान, बेहरा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणताना दिसत आहेत की, “चांगली व्यक्ती बनण्यासाठी तुम्हाला मांस खाणे बंद करावे लागेल.'' त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घेण्यास सांगितले.

या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. IIT चा एका माजी विद्यार्थी म्हणाला की, "या अंधश्रद्धाळू लोकांमुळे 70 वर्षांच्या मेहनतीचा काही उपयोग होणार नाही."

बेहरा याआधीही चर्चेत आले होते

यासोबतच अनेक प्राध्यापकांनी त्यांच्या वक्तव्याला दु:खद म्हटले आहे. मात्र, वादग्रस्त कमेंटमुळे बेहरा चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, त्यांनी पवित्र मंत्रांचा जप करुन आपल्या मित्राच्या अपार्टमेंट आणि कुटुंबाला दुष्ट आत्म्यांपासून मुक्त करण्यात मदत केल्याचा दावा केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

Video: 'अभिषेक झाला, सूर्या झाला'! भारताचा 'हा' फलंदाज आता चोपणार न्यूझीलंडला; प्रॅक्टिसचा व्हिडीओ झाला Viral

Russia Train Attack: 'काळ्या धुराचे लोट अन् रडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश'! रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची रेल्वे सेवा उद्ध्वस्त; 12 जणांचा मृत्यू Watch Video

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

Ajit Pawar Plane Crash: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! अजित पवारांच्या विमान अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर; क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं VIDEO

SCROLL FOR NEXT