98 students committed suicide in last five years in IIT, IIM: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय विद्यापीठे, आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि आयआयएसईआरसह उच्च शिक्षण संस्थांमध्ये गेल्या पाच वर्षांत 98 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
सन 2023 मध्ये आतापर्यंत उच्च शिक्षण संस्थांमध्ये 20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत.
यामध्ये केंद्रीय विद्यापीठांमधील नऊ आणि आयआयटीमधील सात प्रकरणांचा समावेश आहे. ही माहिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.
गेल्या चार वर्षांत नोंदवलेल्या आत्महत्यांपैकी सर्वाधिक प्रकरणे अभियांत्रिकी संस्थांतील (Engineering Colleges) आहेत, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.
त्याचवेळी दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात सुभाष सरकार म्हणाले की, यापैकी निम्म्याहून अधिक विद्यार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील होते.
शिवाय, यातील बहुतेक विद्यार्थी पदव्युत्तर आणि पीएचडी प्रोग्राममध्ये होते.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-हैदराबाद (IIT-H) मध्ये आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. B.Tech द्वितीय वर्षाचा विद्यार्थी कार्तिक याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली.
एका वर्षाच्या आत संस्थेतील विद्यार्थ्यांची ही तिसरी आत्महत्या आहे. 31 ऑगस्ट 2022 रोजी एम.टेकचा विद्यार्थी बी राहुल कॅम्पसमधील वसतिगृहाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत सापडला होता.
राहुलच्या आत्महत्येनंतर पंधरा दिवसांत, बीटेक ची विद्यार्थिनी मेघा कपूर हिने 7 सप्टेंबर 2022 रोजी संगारेड्डी शहरातील पोथीरेड्डीपल्ली येथे एका खाजगी लॉजच्या इमारतीवरून उडी मारली होती.
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी सांगितले की, या कालावधीत केंद्रीय विद्यापीठांमधून सर्वाधिक 17,454 विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले आहे.
त्यानंतर IIT मधून 8,139, NIT मधून 5,623, IISER मधून 1,046 विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या मते, ओडिशामध्ये माध्यमिक शाळा स्तरावर गळतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर मेघालय आणि बिहारचा क्रमांक लागतो.
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही आकडेवारी जाहिर केली.
त्यानुसार, माध्यमिक शाळांमधील राष्ट्रीय स्तरावरील गळतीचे प्रमाण १२.६ टक्के आहे, तर ओडिशामध्ये २७.३ टक्के, त्यानंतर मेघालय २१.७ टक्के, बिहार २०.५ टक्के आणि आसाम २०.३ टक्के आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.