Abhijeet Dwivedi Dainik Gomantak
देश

IIIT लखनऊमधील विद्यार्थ्याला मिळाले तब्बल 1.2 कोटींचे पॅकेज

आयआयआयटी लखनऊसाठी हे जबरदस्त वर्ष आहे. येथील अनेक विद्यार्थ्याना चांगले पॅकेज मिळाले आहे.

दैनिक गोमन्तक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), लखनऊमधील अभिजीत द्विवेदी या विद्यार्थ्याने वार्षिक तब्बल 1.2 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. एवढे मोठे पॅकेज मिळवणारा तो आयआयआयटी लखनऊमधील पहिला विद्यार्थी ठरला आहे. या वार्षिक पॅकेजसह त्याने मागील सर्व प्लेसमेंट रेकॉर्ड तोडले आहेत. (IIIT Lucknow student bags 1.2 crore package from amazon)

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अभिजीत द्विवेदी (Abhijeet Dwivedi) यांची आयर्लंडमधील डब्लिन येथे अ‍ॅमेझॉनमध्ये (Amazon) सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अभियंता म्हणून निवड झाली आहे. अभिजीत माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण घेत आहे. सध्या तो बी. टेकच्या (B. Tech) शेवटच्या वर्षाला आहे. सॉफ्ट स्किल्समुळे त्याला मुलाखतीमध्ये यश मिळण्यास मदत झाली, असे त्याचे म्हणणे आहे.

अभिजीतने याबाबत सांगितले की, मुलाखतीसाठी स्वत:ला तयार करण्यासाठी मी अनेक व्हिडीओ पाहिले. सॉफ्ट स्किल्स खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी पदवीधरांनी असा विचार करू नये की त्यांना फक्त तांत्रिक ज्ञानाची गरज आहे. संवाद कोशल्य आणि देहबोलीही तितकीच महत्त्वाची आहे.

आयआयआयटी लखनऊसाठी (Lucknow) हे एक जबरदस्त वर्ष आहे. अनेक विद्यार्थ्याना (Students) चांगले पॅकेज मिळाले आहे, तर 12 विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT