Supreme Court  Dainik Gomantak
देश

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये संबंध तुटल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही: Supreme Court

अनेकवेळा दिसून आले आहे की एक स्त्री आणि पुरुष लग्नाशिवाय वर्षानुवर्षे एकत्र राहतात आणि एक वेळ अशी येते की त्यांच्या नात्यामध्ये दुरावा येतो.

दैनिक गोमन्तक

दोन व्यक्ती दीर्घकाळ एकत्र राहत असतील आणि नंतर त्यांचे नाते बिघडत असेल, तर बलात्काराचा आरोप करणे योग्य नाही, असा पुनरुच्चार सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सुनावनी दरम्यान केला आहे. खरे तर असे अनेकवेळा दिसून आले आहे की एक स्त्री आणि पुरुष लग्नाशिवाय वर्षानुवर्षे एकत्र राहतात आणि एक वेळ अशी येते की त्यांच्या नात्यामध्ये दुरावा येतो. (Live in Relationship Rape Case)

त्यानंतर महिलेने पुरुषावर बलात्काराचा आरोप देखील केला. अनेकवेळा लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोपही करण्यात येतो. पण कोर्टाचे म्हणणे आहे की अशा प्रकरणामध्ये पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही.

सध्याचे प्रकरण म्हणजे राजस्थानमधील एक महिला आणि एक पुरुष चार वर्षांपासून एकत्र राहत होते. त्याचे लग्न झालेले नव्हते. या नात्यातून तिला एक मुलगीही आहे, पण नंतर स्त्री आणि पुरुषाचे नाते बिघडते तर त्यानंतर महिलेने त्या व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने (Rajasthan High Court) या व्यक्तीला जामीन देण्यास नकार दिला आहे.

याच प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत त्या व्यक्तीला जामीन मंजूर केला आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, जर दोन व्यक्ती एकत्र राहत असतील आणि नंतर संबंध बिघडले तर त्यात बलात्काराचे कोणतेही प्रकरण नाहीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT