Madras High Court ANI
देश

कौटुंबिक हिंसाचार थांबत नसेल तर पतीला घराबाहेर काढा- मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

आरोपी पती घरघूती हिंसाचार आणि शिवीगाळ करण्यापासून थांबत नसेल तर 'घरगुती शांतता' पूर्ववत करण्यासाठी त्याला घराबाहेर काढले जाऊ शकते

दैनिक गोमन्तक

Madras High Court: कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी मद्रास हायकोर्टाने पतीवर कडक टीका केली आहे. घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलेच्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाने पतीला घर सोडण्यास सांगितले आहे. पतीचे घर सोडून घरगुती शांतता राखता येत असेल, तर न्यायालयाने तसे आदेश द्यावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार, पतीकडे राहण्यासाठी दुसरे घर किंवा पर्याय नसला तरी त्याला घराबाहेर काढता येते. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, पतीने घरात पत्नीसोबत हिंसाचार केला आणि ही त्याची रोजची सवय असेल, तर त्याला घरातून हाकलून दिले जाऊ शकते.

अशा परिस्थितीत पतीला घरातून बाहेर काढता येते

मद्रास उच्च न्यायालयात घरगुती वादाशी संबंधित प्रकरणावर सुनावणी करताना, न्यायमूर्ती आर एन मंजुळा यांनी 11 ऑगस्ट रोजी या प्रकरणात आदेश देताना सांगितले की, "आरोपी पती घरघूती हिंसाचार आणि शिवीगाळ करण्यापासून थांबत नसेल तर 'घरगुती शांतता' पूर्ववत करण्यासाठी त्याला घराबाहेर काढले जाऊ शकते. ज्या महिला घरात पतीच्या उपस्थितीमुळे घाबरतात त्यांच्याबाबत न्यायालयांनी त्याच्याबाबत उदासीन राहू नये. कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये महिलांच्या संरक्षणासाठी दिलेले आदेश व्यावहारिक असले पाहिजेत, असे न्यायालयाने म्हटले आहे."

घराबाहेर काढण्यासाठी पोलिसांना पाठवण्यात येणार

या महत्त्वाच्या खटल्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती आर.एन.मंजुळा यांनी पीडित पत्नीच्या पतीला दोन आठवड्यांत घराबाहेर पडावे लागेल, असे आदेश दिले. पतीने असे केले नाही तर त्याला घराबाहेर काढण्यासाठी पोलिस पाठवले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Arpora Nightclub Fire: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

SCROLL FOR NEXT