CM charanjit singh channi Dainik Gomantak
देश

शेतकऱ्यांना त्रास झाल्यास 'गर्दन पेश कर दूंगा'

पंजाबच्या (Panjab)लोकांच्या अपेक्षांनुसार पुढे जायचे आहे. पंजाब हे शेतीप्रधान (Agricultural) राज्य आहे, शेतीवर काही अडचण आल्यास मी माझा गळा कापून देईल.

दैनिक गोमन्तक

पंजाब: नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (CM Charanjit Singh Channy) पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यावेळी पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत (Harish Rawat)आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूही (Navjyot Singh Sidhu)उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान ते भावनिक झाले आणि शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणाही केल्या.पंजाब हे शेतीप्रधान राज्य आहे, शेतीवर काही अडचण आल्यास 'मैं अपना गला काट कर दे दूंगा'.

चन्नी यांनी पत्रकार परिषदेची (Press conference)सुरुवात करत, गुरबानी आणि गुरु गोबिंद सिंह यांचा संदर्भ देऊन केली. ते म्हणाले की, काँग्रेसने (Congress)त्या सामान्य माणसाला मुख्यमंत्री बनवले आहे ज्याच्या घरावर छप्पर नव्हते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, राहुल गांधी (Rahul Gandhi) गरीब लोकांच्या पाठीशी नेहमी उभे असतात. राहुल गांधी नेहमी गरीबांबद्दल बोलतात.

शेतकऱ्यांचे प्रतिनिधी:

मुख्यमंत्री म्हणाले की, आज काँग्रेसने (Congress)एक संयमी माणूस मुख्यमंत्री म्हणून बनवला आहे. मी गरिबांचे प्रतिनिधित्व करतो. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि संपूर्ण पक्षाचा आभारी आहे. तसेच मी त्या लोकांचा प्रतिनिधी आहे जे सामान्य शेतकरी आहेत. ज्यांना पंजाबचे भले व्हायचे आहे त्यांनी माझ्याशी सामील व्हा.

'वडील रिक्षा चालक आणि मी पण:

चन्नी म्हणाले, 'माझ्या वडिलांनी रिक्षा चालवली आहे. आणि मी स्वतः ही रिक्षा चालवली आहे. मी रिक्षाचालकांचा प्रतिनिधी आहे. मी सामान्य लोकांचा प्रतिनिधी आहे. व्यापारी माझ्यापासून दूर रहा. मी सामान्य माणसाचे नेतृत्व करीन. शेती बुडाली तर भारत बुडेल. जर शेतकरी असेल तर फक्त ग्राहकच शेतकऱ्याकडे येतो. पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वकाही त्याग करण्यास तयार आहे.

शेतकऱ्यांचे हाल होऊ देणार नाही:

मला पंजाबच्या लोकांच्या अपेक्षांनुसार पुढे जायचे आहे. पंजाब हे शेतीप्रधान राज्य आहे, शेतीवर काही अडचण आल्यास मी माझा गळा कापून देईल.

कृषी कायदा केंद्रातून रद्द करा:

कृषी कायद्यांबाबत पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकरी बुडला तर पंजाब बुडेल, तसेच त्या सोबत देशही बुडेल. शेतकरी सुखी होईल तरच पंजाब सुखी होईल. शेतकरी संपला, मजूर संपला, गरीब संपला. त्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की काळे कृषी कायदे मागे घ्यावेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही करावे लागेल ते करा. आम्ही शेतकऱ्यांना प्रत्येक प्रकारे पाठिंबा देतो.

वीज बिल माफ केले जाईल:

विजेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी मोठ्या घोषणा केल्या. ते म्हणाले, शेतकऱ्यांची वीज माफ करावी. तसेच पंजाबमधील शेतकऱ्यांची वीज बिले माफ केली जातील अशी घोषणा केली. थकबाकी भरल्यामुळे कोणाचे मीटर डिस्कनेक्ट झाले असेल तर पेमेंट माफ केल्यानंतर पुन्हा जोडणी जोडली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT