Dog Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: ते आमचं बाळ...! कुत्र्याला सोबत नेण्यासाठी हैदराबादच्या जोडप्याने मोजले तब्बल '15 लाख'; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

Dog Viral Video: माणसाचं आपल्या पाळीव प्राण्यांवर, विशेषतः कुत्र्यांवर असलेलं प्रेम हे केवळ शब्दांपुरतं मर्यादित नसतं.

Manish Jadhav

Dog Viral Video: माणसाचं आपल्या पाळीव प्राण्यांवर, विशेषतः कुत्र्यांवर असलेलं प्रेम हे केवळ शब्दांपुरतं मर्यादित नसतं. कुत्र्यांची निस्वार्थ माया करण्याची अद्भुत शक्ती यामुळे अनेक जोडप्यांसाठी ते केवळ प्राणी नसून त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनतात. अनेकदा आयुष्यातील कठीण काळात ही मुकी जनावरं साथ देतात आणि म्हणूनच त्यांच्या प्रती असलेल्या प्रेमाची मर्यादा नेमकी कुठे संपते, याचा अंदाज बांधणं कठीण होतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जोडप्याची कहाणी तुफान व्हायरल होत आहे, ज्यांनी आपल्या लाडक्या 'स्काय' नावाच्या कुत्र्याला स्वतःसोबत परदेशात नेण्यासाठी जे काही केलं, ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

हैदराबादमधील एक जोडपं जेव्हा ऑस्ट्रेलियाला स्थायिक होण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांना तिथल्या कडक नियमांमुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. नियमांनुसार, भारतातून (India) कुत्र्यांना थेट ऑस्ट्रेलियात नेता येत नाही. त्यासाठी त्यांना किमान सहा महिने एखाद्या 'रेबीजमुक्त' देशामध्ये राहणं अनिवार्य असतं.

आपल्या लाडक्या स्कायला सोडून जाणं या जोडप्याला अशक्य होतं. त्यामुळे त्यांनी स्कायला सोबत नेण्यासाठी तब्बल 15 लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेत स्कायला सहा महिने क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार होतं. त्यांनी दुबईची निवड केली आणि तिथे स्कायच्या राहण्याची सोय केली. सुरुवातीचा एक महिना हे जोडपं स्वतः तिथे स्कायसोबत राहिलं, जेणेकरुन त्याला नवीन वातावरणाची सवय होईल. पण त्यानंतर त्याला तिथे सोडून ऑस्ट्रेलियाला जाणं, हा त्यांच्यासाठी एखाद्या पोटच्या मुलाला दूर ठेवण्यासारखा अत्यंत वेदनादायी अनुभव होता.

पुढचे सहा महिने या जोडप्यासाठी खूप तणावाचे आणि चिंतेचे गेले. ते सतत दुबईतील बोर्डिंग सुविधेशी संपर्कात असायचे, तासनतास व्हिडिओ कॉल करुन स्कायचा चेहरा पाहायचे आणि तो ठीक असल्याची खात्री करुन घ्यायचे. अखेर जेव्हा सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि स्काय ऑस्ट्रेलियात त्यांच्या घरी पोहोचला, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या जोडप्यानं आपली ही संपूर्ण कहाणी इंस्टाग्रामवर 'kahaanioftails' या हँडलवरुन शेअर केली.

त्यांनी म्हटलं की, अनेकांना 15 लाख रुपये खर्च करणं हा निर्णय अतिरेकी वाटेल, पण आमच्यासाठी स्काय हा केवळ पाळीव प्राणी नसून आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. नेटिझन्सनीही या जोडप्याचं भरभरुन कौतुक केलं असून प्राण्याप्रती असलेल्या या निस्वार्थ प्रेमाचा सन्मान केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Sterilization: नसबंदीसाठी खर्च 3,500, सरकारी मदत फक्त 1,800! निधीच्या नियमांवर कोर्टाचे ताशेरे; अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा

Aggressive Dog Breeds Ban: 'आक्रमक' कुत्र्यांच्या बंदीचा निर्णय सरकारने तूर्त गुंडाळला, केंद्राच्या निर्णयाविरोधात याचिका; न्यायालयीन निकालाची गोवा सरकारला प्रतीक्षा

RBI Repo Rate Hike: होम लोन, कार लोन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! आरबीआयने रेपो रेटमध्ये केली 'इतक्या' टक्क्यांची वाढ; 4 वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

Teacher Regularization: तासिका शिक्षकांना मोठा दिलासा! 10 वर्षांहून अधिक सेवा केलेल्यांना नियमित करण्याची प्रक्रिया 15 दिवसांत सुरू; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Car Accident: टेनिस सामना खेळून परतताना काळाचा घाला! कारच्या भीषण अपघातात तीन खेळाडूंचा मृत्यू; 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT