कोरोनासोबतच केरळमध्ये (Kerala) झिका विषाणूच्या (Zika Virus) रुग्णांची संख्याही सतत वाढत आहे. झिकाची आणखी 5 प्रकरणांची नोंद झाल्याने आतापर्यंत राज्यात आढळलेल्या झिका संसर्गाची एकूण संख्या 61 झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ज्या पाच लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे ते सर्व तिरुअनंतपुरमचे रहिवासी आहेत. अलाप्पुझा येथे झालेल्या चाचणीत संसर्गाची ही पाच प्रकरणे आढळली आहेत. (How To Identify symptoms of Zika virus)
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, या पाच रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही कारण या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. राज्यात झिका विषाणूची लागण होणाऱ्या लोकांची संख्या वाढत असल्याने लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन आरोगय मंत्र्यांनी केले आहे. झिका विषाणूच्या वाढत्या प्रकरणांचा विचार करता, केरळमध्ये झिका संसर्गाची प्रकरणे अनपेक्षित नाहीत, कारण हा विषाणू डेंग्यू आणि चिकनगुनिया पसरवणाऱ्या एडीज डासापासून पसरतो. असे केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सागितले.
अशा प्रकारे या रोगावर आपण नियंत्रित मिळवू शकता
आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संक्रमित व्यक्ती बेडवर विश्रांती घेत असेल तर हा संसर्ग नियंत्रित केला जाऊ शकतो. झिका व्हायरससाठी सध्या कोणतीही अँटीफंगल औषध किंवा लस उपलब्ध नाही. असे म्हटले जात आहे की हा विषाणू गर्भवती महिलांसाठी धोकादायक आहे, कारण यामुळे पोटातील बाळाला या डासाच्या चावल्याने संसर्ग होवू शकतो, ज्यामुळे बाळामध्ये कोणत्याही प्रकारची इजा होण्याची शक्यता आहे.
झिका विषाणूची लक्षणे
या विषाणूची लक्षणे डेंग्यू आणि चिकनगुनिया आजारासारखीच आहेत. डास चावल्यानंतर 2 ते 7 दिवसांच्या दरम्यान एखाद्या व्यक्तीला झिका विषाणूची लागण होऊ शकते. झिका विषाणूच्या लक्षणांमध्ये सौम्य ताप, डोकेदुखी, स्नायू, सांधेदुखी, मळमळ, उलट्या आणि अस्वस्थ वाटणे असा प्रकारच्या लक्षणांचा समावेश आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.