How to recognize the common symptoms of corona in children 
देश

मुलांमध्ये कोरोनाची सामान्य लक्षणे कशी ओळखावी?

गोमंन्तक वृत्तसेवा

कोरोना साथीच्या अनियंत्रित प्रादुर्भावाखाली केंद्र सरकारने मुलांमध्ये कोरोना संक्रमण आणि उपचारांसाठी नवीन प्रोटोकॉल जारी केला आहे. केंद्र सरकारने असे म्हटले आहे की बहुतेक मुलांमध्ये संसर्गाची सौम्य लक्षणे असतात, अशी काही मुले आहेत ज्यांना संसर्गाची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे लक्षणं नसलेल्या मुलांना उपचाराची आवश्यकता नसते. त्यांच्या आरोग्यावर देखरेख ठेवणे खूप महत्वाचे आहे.

केंद्र सरकारने असे म्हटले आहे की, मुलांमध्ये एकतर लक्षणे नसतात किंवा त्यांच्यात अगदी सौम्य लक्षणे आढळतात. ताप, खोकला, श्वास लागणे, घसा खवखवणे असे सामान्य लक्षणे असू शकतात. काही मुलांमध्ये पटन शक्ती संबधी पण लक्षण देखील असू शकतात. काही मुले मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MIS) पासून ग्रस्त आहेत. अशा मुलांना रुग्णालयात उपचारांची आवश्यकता असू शकते. अशा प्रकारच्या अस्वस्थतेतून ग्रस्त असलेल्या मुलांना 100.4 डिग्री ताप देखील असू शकतो.

मुलांच्या आरोग्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण प्रश्न

1) प्रश्न: घरात सौम्य लक्षणे असलेल्या मुलांचा उपचार कसा करावा?
उत्तरः
जर मुलाला ताप आला असेल तर त्याचे वजन आणि वयानुसार डॉक्टर दर चार ते सहा तासांनी पॅरासिटामोल औषध देऊ शकतात. जर घसा खवखवला असेल तर ते कोमट पाण्याने ठीक होवू शकतो. शरीरात पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जास्त प्रमाणात द्रवपदार्थ द्या. सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना-संक्रमित मुलांना अँटीबायोटिक्स देण्याची आवश्यकता नाही. पालकांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, रेमडेसिवीर आणि डेक्सामेथासन इत्यादी औषधे स्वत: च्या अंदाजाने देऊ नयेत.

2) प्रश्न: मुलांमध्ये कोरोनाची सामान्य लक्षणे कशी ओळखावी?
उत्तरः जर मुलाची ऑक्सिजन पातळी 90 टक्के असेल तर ती सामान्य श्रेणीत येईल. जेव्हा मुलास दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीचा संसर्ग होतो तेव्हा श्वासोच्छवासाचे ठोके प्रति मिनिट 60 पेक्षा कमी नसावेत. दोन ते बारा महिन्यांच्या मुलामध्ये हे ठोके 50 पेक्षा जास्त असावे. एक ते पाच वर्ष वयोगटातील मुलांमध्ये मिनिट 40 असावे. त्याचप्रमाणे पाच वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये श्वास घेण्याचे प्रमाण प्रति मिनिट तीस वेळा असावे. सामान्य लक्षणे असलेल्या मुलांना न्यूमोनियाचा त्रास देखील होऊ शकतो. मात्र, कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यकता नाही. मध्यम लक्षणे असलेल्या मुलांना वेळ न घालवता कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागेल. मुलाच्या तापापासून ऑक्सिजनची लेवल मोजावी लागेल. शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून जास्त प्रमाणात द्रवपदार्थ द्यावे.

3)प्रश्नः मुलास कोरोनाचा गंभीर संसर्ग झाला हे कसे ओळखायचे?
उत्तरः मुलांच्या ऑक्सिजनची पातळी 90 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्याला गंभीर संक्रमण आहे. रक्तामध्ये ऑक्सिजनचा अभाव यामुळे त्याचे ओठ निळे होऊ शकतात. श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अस्वस्थता आणि चिंताग्रस्ततेसह, तो वारंवार बरे वाटत नाही याबद्दल बोलेल. या प्रकारची अस्वस्थता असलेल्या मुलांच्या छातीत गंभीर संक्रमण होण्याची शक्यता असते. काही मुलांमध्ये थकवा येण्याची समस्या उद्भवू शकते. अशा मुलांचा उपचार फक्त रुग्णालयात शक्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Political Reservation: सरकारनंतर 'मिशन'ही सुप्रीम कोर्टात, 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी न्यायालयीन लढा आणखी तीव्र

नरकासुरांचा उच्‍छाद! ज्‍येष्‍ठ नागरिक हवालदिल; मध्‍यरात्रीपर्यंत गोंगाट, न्‍यायालयाने दिलेल्‍या आदेशाच्या अंमलबजावणीपूर्वीच ध्वनिप्रदूषणाचा कळस

Diwali Horoscope: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 4 राशींचे नशीब चमकणार! नोकरी, शिक्षण अन् करिअरमध्ये मिळणार मोठे यश; घरात येणार आनंदाची बातमी

Shami Tree: 400 जणांनी प्राण दिले, पण शमीवृक्ष तोडू दिला नाही! पांडवांच्या शस्त्रांशीही जोडलेला आहे या पवित्र झाडाचा इतिहास

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

SCROLL FOR NEXT