Kerala High Court Dainik Gomantak
देश

Kerala High Court: केरळ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'हॉस्टेल जेल नाही...'

Kerala High Court: केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले की, 'वसतिगृहे तुरुंग नाहीत.' राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना सरकारच्या नवीन आदेशाचे पालन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

दैनिक गोमन्तक

Kerala High Court: केरळ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आला आहे. न्यायालयाने गुरुवारी सांगितले की, 'वसतिगृहे तुरुंग नाहीत.' राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना सरकारच्या नवीन आदेशाचे पालन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यामुळे विद्यार्थिनींसमोरील अडथळे दूर झाले आहेत. मुला-मुलींना समान घटनात्मक अधिकार आहेत आणि वसतिगृहातही मुला-मुलींसाठी सर्व नियम आणि कायदे समान असतील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील (Hospital) विद्यार्थिनींनी गेल्या महिन्यात उच्च शिक्षण विभागाच्या अधिसूचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना रात्री 9.30 नंतर वसतिगृह सोडण्यास मनाई केली होती. विद्यार्थ्यांसाठी कोणतेही निर्बंध नसताना रात्री 9.30 नंतर कर्फ्यू लागू करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, न्यायमूर्ती देवन रामचंद्रन म्हणाले की, “मुलींना घटनात्मक अधिकार आहेत. त्यांच्यावर अशी भेदभावाची बंधने लादता येणार नाहीत. वसतिगृहे तुरुंग नाहीत.” न्यायालयाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्राचार्यांना 6 डिसेंबर रोजी सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले, ज्याने काही नियम शिथिल केले. विद्यार्थ्यांना किमान अटींसह निर्धारित वेळेनंतर प्रवेश देण्याची परवानगी दिली.

दुसरीकडे, राज्य महिला आयोगानेही न्यायालयाला सांगितले की, 'नव्या आदेशात लिंग समानता राखण्यात आली आहे.' उच्च शिक्षण विभागाने या याचिकेच्या सुनावणीदरम्यान यापूर्वी न्यायालयाला सांगितले होते की, 'पालकांची मागणी आणि रात्रीच्या वेळी विद्यार्थिनींच्या (Students) सुरक्षेचा विचार करुन कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.'

न्यायमूर्ती देवन रामचंद्रन म्हणाले की, 'कॅम्पस सुरक्षित करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.' नंतर न्यायालयाने सरकारला सर्व भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढून टाकण्यासाठी नवीन आदेश जारी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे 6 डिसेंबर रोजी नवीन आदेश काढण्यात आला. दोन दिवसांपूर्वी केरळ आरोग्य विज्ञान विद्यापीठाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT