Snake Viral Video Dainik Gomantak
देश

Snake Viral Video: आरशावर उडाली विषाची कारंजी, स्वतःच्याच सावलीशी भिडला साप; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Poisonous Snake Sees Reflection In Mirror: सोशल मीडियावर अनेकदा सापांचे अंगावर काटा आणणारे व्हिडिओ व्हायरल होतात, परंतु नुकताच व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी डोळे विस्फारले आहेत.

Manish Jadhav

Horned Viper Attacks Mirror Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा सापांचे अंगावर काटा आणणारे व्हिडिओ व्हायरल होतात, परंतु नुकताच व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी डोळे विस्फारले आहेत. या व्हिडिओमध्ये एक अतिशय विषारी साप आरशात स्वतःचेच प्रतिबिंब पाहून एवढा भडकला की, त्याने समोरच्या आरशावर स्वतःचीच सावली शत्रू समजून केलेल्या हल्ल्याचा थरार तुफान व्हायरल झाला.

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक भयंकर साप बसलेला दिसत आहे. त्याचवेळी एक व्यक्ती त्याच्या अगदी समोर एक छोटासा आरसा ठेवते. आरशात स्वतःचे रुप दिसताच सापाची दिशाभूल होते. आरशातील स्वतःचेच प्रतिबिंब पाहून हा दुसरा प्रतिस्पर्धी असल्याचा भास त्याला होतो. त्यामुळे तो क्षणाचाही विलंब न लावता आक्रमक पवित्र्यात येतो आणि आरशावर तातडीने हल्ला करतो.

सापाने आरशावर जोरदार दंश मारण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या विषदातामधून पांढऱ्या रंगाचे विष वेगाने बाहेर पडून आरशाच्या काचेवर फवाऱ्यासारखे पसरते. लांबून पाहताना असा भास होतो की, साप जणू आरशावर विषाची कारंजे उडवत आहे. हे दृष्य इतके भयंकर आणि थरारक आहे की, सोशल मीडिया (Social Media) युजर्स हे पाहून पुरते हादरले.

तज्ज्ञांच्या मते, चिंपांझी किंवा डॉल्फिनसारख्या प्राण्यांप्रमाणे सापांमध्ये आरशात स्वतःला ओळखण्याची क्षमता नसते. साप त्याच्या सभोवतालच्या वस्तू किंवा धोके समजून घेण्यासाठी दृष्टीपेक्षा वास आणि जमिनीवरील कंपनांवर अधिक अवलंबून असतो. आरशात समोर आकृती दिसते परंतु तिचा कोणताही वास येत नसल्यामुळे, साप त्या आकृतीला आपल्या हद्दीत घुसलेला शत्रू मानतो. काचेवर सापाचे विष उडणे ही कोणतीही थुंकण्याची क्रिया नसून, काचेच्या टणक पृष्ठभागावर हल्ला केल्यामुळे विषदातामधून बाहेर पडलेले विष आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT