Jammu Kashmir police Dainik Gomantak
देश

हिजबुल मुजाहिद्दीनच्या प्रमुख कमांडरला बेंगळुरूमध्ये केली अटक

शुक्रवारच्या नमाजावेळी संशयित उपस्थितांना संबोधित करत असे

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीर पोलीस आणि बेंगळुरू शहर पोलिसांनी रविवारी एका संशयित दहशतवाद्याला अटक होती, जो कथितपणे हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख कमांडर आहे. सुरक्षा दलाने मंगळवारी ही माहिती दिली आहे. तसेच कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांच्या कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे. पकडला गेलेला दहशतवादी हा हिजबुल मुजाहिद्दीनचा असून बेंगळुरूमध्ये पकडला गेला आहे. ( Hizbul Mujahideen commander arrested in Bangalore )

दहशतवादी, पत्नी आणि मुलांसह जम्मू-काश्मीरमधून पळून गेला होता अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. याबाबत ते म्हणाले की, तालिब हुसेनला बेंगळुरू येथून अटक केल्याची केली आहे. पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना बोम्मई म्हणाले की, होय, संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे."

जम्मू-काश्मीर पोलीस आणि बेंगळुरू शहर पोलिसांनी रविवारी एका संशयित दहशतवाद्याला अटक केली, जो कथितपणे हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख कमांडर आहे. सुरक्षा दलाने मंगळवारी ही माहिती दिली. कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव तालिब हुसैन असे असून जम्मू-काश्मीरमधील हिंदूंच्या लक्ष्यित हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिब हुसैन पत्नी आणि मुलांसह जम्मू-काश्मीरमधून पळून गेला होता. सुरक्षा दलांनी त्याचा शोध मोहीम तीव्र केली होती. तो बंगळुरूमध्ये लपून बसला होता. तालिबने येथील श्रीरामपुरा येथील मशिदीत आश्रय घेतला होता आणि तो शुक्रवारच्या नमाजच्या वेळी उपस्थितांना संबोधित करत असे.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यावेळी म्हणाले की सामान्यत: पोलिस त्याच्यासारख्या लोकांवर पाळत ठेवतात. जम्मू आणि काश्मीर पोलिसांना जी काही मदत हवी असेल, ती आम्ही देऊ. याआधीही सिरसी आणि भटकळमध्ये अशी अटक करण्यात आली होती," असे ते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT