Bus accident
Bus accident  Dainik Gomantak
देश

हिमाचल: कुल्लूमध्ये बस दरीत कोसळली; 12 प्रवासी दगावले

दैनिक गोमन्तक

सोमवार दिनांक 7 रोजी हिमाचलच्या कुल्लूमध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत प्रवाशांना घेऊन जात असलेली खासगी बस सकाळी 8 वाजता दरीत कोसळली आहे. बस वाहकाने दिलेल्या माहितीनुसार या बसमधुन बसमध्ये 20 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी अद्याप 12 प्रवाशांचा मृतू झाला आहे. अचानक मातीवरुन बस सरकल्याने थेट दरीत कोसळली असल्याचे बस वाहकाने दिली माहिती . (Himachal kullu bus accident 12 death )

हे सर्व फार कमी कालावधीत घडल्याने प्रवाशांना बाहेर पडण्यास वेळच मिळाला नाही. त्यामूळे अधिक प्रमाणात जीवित हाणी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कुल्लूमधील सेंज व्हॅलीमध्ये हा अपघात झाला. यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता जिल्हा आयुक्तांनी व्यक्त केली आहे. बस कुल्लूहून सेंजकडे जात होती. या बसमध्ये शाळकरी मुले प्रवास करत होती. केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

हिमाचल प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये आणि जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे. तसेच किरकोळ दुखापत झालेल्यांना तातडीने 15 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

पीएम मोदींनी या अपघातावर केला शोक व्यक्त

पंतप्रधान म्हणाले- हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दुःखाच्या काळात मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. मला आशा आहे की जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे होतील. हिमाचलचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनीही अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT