Weather Updates Dainik Gomantak
देश

दिल्लीसह 'या' राज्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस : IMD

IMD नुसार, येत्या काही दिवसांत दिल्लीत मेघगर्जनेसह ढगाळ आकाश, विजांचा कडकडाट आणि वारे वाहण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय हवामान विभाग (IMD) ने सांगितले की राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) शनिवारी कमाल तापमान 43.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे, जे सामान्य स्थिती पेक्षा 4 अंशांनी जास्त आहे. IMD नुसार, येत्या काही दिवसांत दिल्लीत मेघगर्जनेसह ढगाळ आकाश, विजांचा कडकडाट आणि वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे, परंतु 15 जूनपर्यंत उष्णतेपासून आराम मिळण्याची शक्यता नाही. स्कायमेट वेदरच्या अहवालात असे म्हटले आहे की दिल्ली, हरियाणा, वायव्य राजस्थान आणि हिमाचल प्रदेशच्या भागांमध्ये 15 जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. (Weather Updates News)

पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहू शकते. पश्चिमेकडील उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे वायव्य आणि मध्य भारत 2 जूनपासून उष्णतेच्या लाटेमध्येच आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, येत्या दोन दिवसांत पश्चिम द्वीपकल्पीय किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. ईशान्य भारत आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची देखील शक्यता आहे. नैऋत्य मोसमी पावसाने मुंबईसह कोकणातील बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हजेरी लावली आहे.

मान्सून 17 ते 20 जून या कालावधीत उत्तर प्रदेशात प्रवेश करू शकतो,

भारतीय हवामान विभागाच्या लखनौ केंद्राचे संचालक जेपी गुप्ता म्हणाले की पूर्व उत्तर प्रदेशात असे काही घटक तयार होत आहेत, ज्यामुळे संपूर्ण राज्याच्या हवामानात बदल होऊ शकतो. आता 2-3 दिवस शहरातील लोकांना कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेशात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे तर त्याचा परिणाम 15 जूनपासून दिसून येणार आहे. वेळोवेळी ढगाळ वातावरण राहील, तापमानात किंचित घट देखील होऊ शकते. मान्सून सध्या ईशान्येकडील राज्यांमध्ये बरसत आहे. 17 ते 20 जून दरम्यान मान्सून उत्तर प्रदेशात दाखल होऊ शकतो. बिहार आणि बंगालच्या सीमेवर मान्सूनमध्ये दोन दिवसांत वेग वाढण्याची आशा हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

ईशान्येत वेळेवर मान्सून,

अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या वेगानुसार परिस्थिती निर्माण झालेली आहे. या दृष्टीने येत्या काही दिवसांत हवामान पद्धतीत बदल होऊन पाऊस जास्त पडण्याची अपेक्षा आहे. आता मान्सूनचा कालावधी वाढला तरच उन्हापासून दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT