Goa Weather Updates Dainik Gomantak
देश

Weather Updates : जाणून घ्या देशाच्या कोणत्या भागात वाढणार उष्णतेची लाट

मध्य भारत आणि महाराष्ट्रात पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

दैनिक गोमन्तक

देशातील बहुतांश भागात लोकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. दिल्ली एनसीआरमध्ये तापमानाचा पारा वाढत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार , दिल्लीत आज तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. त्याचबरोबर आजसुद्धा उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मात्र, 1 ते 2 एप्रिल रोजी तापमानात किंचित घट होऊ शकते. मध्य भारत आणि महाराष्ट्रात पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. 1950 नंतर दुसऱ्यांदा दिल्लीत मार्चमध्ये एवढा उष्मा होत असल्याचं IMD अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. (Goa Weather Updates)

10 दिवस पावसाची शक्यता नाही

दिल्ली हवामान विभागाचे आरके गेनामनी म्हणाले की, दिल्ली, राजस्थान, मध्य भारत, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगडमध्ये पुढील 7-10 दिवस पावसाची शक्यता नाही. केरळ, कर्नाटकचा काही भाग आणि ईशान्येत फक्त थोडा पाऊस पडेल. त्याच वेळी मुंबईतील जयंत सरकार (IMD) यांनी सांगितले की, मध्य महाराष्ट्र म्हणजे अहमदनगर, सोलापूर, जळगाव. यासोबतच मराठवाड्यात आज, उद्या शुक्रवारी आणि परवा शनिवारी उष्ण वारे वाहतील. त्याचबरोबर पुढील 5 दिवस येथे उष्ण वारे वाहणार नाहीत, ही मुंबईकरांसाठी (Mumbai) दिलासादायक बाब आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पंजाब, हरियाणा आणि लगतच्या भागात कोरडे चक्रीवादळ कायम आहे, ज्यामुळे या भागात उष्णता (Heat Wave) तीव्र होत आहे. गेल्या 24 तासात केरळ आणि लक्षद्वीपमध्ये तुरळक पाऊस झाला आहे. ईशान्य भारत, सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये हलका पाऊस झाला आहे. त्याचवेळी पश्चिम आणि पूर्व राजस्थानच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेने लोकांना घामाघूम करून सोडले आहे. हिमाचल प्रदेश, सौराष्ट्र आणि कच्छ, जम्मू प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

पुढील 24 तासांत पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, दक्षिण हरियाणाचा काही भाग, दिल्ली, सौराष्ट्र आणि कच्छ, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि विदर्भ तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. दक्षिण उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिशाच्या काही भागातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

SCROLL FOR NEXT