Hyderabad News  Dainik Gomantak
देश

प्रेम, गर्लफ्रेंड, पिझ्झा आणि टेरेसवरची रात्र... अखेर तो बिचारा कोसळलाच

गर्लफ्रेंडच्या वडीलांच्या भीतीने जीवाला मुकला

Akshay Nirmale

Hyderabad News: प्रेमात माणसं वेडी होतात, असे बोलले जाते. आजूबाजूच्या घटनांकडे पाहिले तर असे अनेक प्रकार दिसून येतात. नुकताच हैदराबादमधून अशी एक घटना समोर आली आहे. यात अवघ्या २० वर्षाच्या युवकाला गर्लफ्रेंडसाठी जीवाला मुकावे लागले आहे.

हा तरूण पिझ्झा घेऊन मध्यरात्री गर्लफ्रेंडच्या फ्लॅटवर गेला होता. पण गर्लफ्रेंडच्या वडीलांपासून लपताना टेरेसवरून पडून त्याचा मृत्यू झाला आहे. हैदराबादच्या बोराबांडा भागात रविवारी पहाटे ही घटना घडली. शोएब असे या युवकाचे नाव आहे.

मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटायला तो तिच्या घरी गेला होता. या दोघांचीही लेटनाईट डेट ठरली होती. डेटसाठी दोघेही टेरेसवर गेले. पण गर्लफ्रेंडच्या वडिलांच्या पावलाचा आवाज ऐकू येताच, दोघांचीही भीतीने गाळण उडाली. शोएब मैत्रिणीच्या वडीलांपासून लपण्याचा प्रयत्न करू लागला. याच प्रयत्नात तो फ्लॅटच्या छतावर गेला.

तिथे वायर्सचा आधार घेण्याचाय नादात त्याचा तोल गेला आणि तो इमारतीवरून खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना झाली. शोएबला तातडीने उस्मानिया रुग्णालयात नेण्यात आले. तेथे पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत मुलाच्या वडीलांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करून पोलिसांत तक्रार दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT