Crime  Dainik Gomantak
देश

धक्कादायक! नॉनव्हेज उपलब्ध नाही म्हणून त्याने हॉटेलमध्ये केला गोळीबार

सिकंदराबादचे पोलीस सर्कल ऑफिसर सुरेश कुमार यांनी सांगितले की, चौधरीवाडा भागातील रहिवासी अब्दुल वाहिद यांच्या हॉटेलमध्ये ही घटना घडली.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील सिकंदराबाद भागात रविवारी नॉनव्हेजवरून मोठा वाद झाला. या वादात एका व्यक्तीवर गोळी झाडण्यात आली आणि हॉटेलची तोडफोड करण्यात आली. सिकंदराबादचे पोलीस सर्कल ऑफिसर सुरेश कुमार यांनी सांगितले की, चौधरीवाडा भागातील रहिवासी अब्दुल वाहिद यांच्या हॉटेलमध्ये ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी हॉटेलमध्ये आलेल्या एका माणसाने नॉनव्हेज जेवणाची मागणी केली. वाहिदने नॉनव्हेज (Non-veg) उपलब्ध नसल्याचे सांगताच तो संतापून हॉटेलमधून निघून गेला. थोड्यावेळाने तो काही लोकांना घेऊन परतला. तो आणि त्याच्याबरोबर आलेल्या लोकांनी मिळून हॉटेलची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्याने हॉटेलमध्ये (Hotel) गोळ्या देखील झाडल्या. यातील एक गोळी वाहिदचा भाचा अतीकच्या पायाला लागली. त्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले. अतीकवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. उर्वरीत आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT