hd revanna  dainik gomantak
देश

HD Revanna: बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवण्णा यांना एसआयटीने घेतले ताब्यात; अपहरण प्रकरणात कारवाई

Karnataka Sex Scandal Case: बंगळुरुमधील केआर नगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे.

Manish Jadhav

Karnataka Sex Scandal Case: बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरुमधील केआर नगर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. एसआयटीचे पथक आज त्यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचले होते.

वास्तविक, कर्नाटकचे माजी मंत्री एचडी रेवन्ना आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना यांच्यावरही अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या नवीन प्रकरणात, म्हैसूर जिल्ह्यातील कृष्णराजा नगर येथील रहिवासी असलेल्या 20 वर्षीय तक्रारदाराने सांगितले की, रेवण्णा यांनी त्याच्या आईचे अपहरण केले होते. तरुणाने पुढे सांगितले की, 6 वर्षांपूर्वी त्याची आई होलेनारसीपुरा येथील रेवण्णा यांच्या घरी काम करायची. 3 वर्षांपूर्वी ती काम सोडून आपल्या गावी परतली. तरुणाच्या म्हणण्यानुसार, 5 दिवसांपूर्वी रेवण्णा यांचे सहकारी सतीश बबन्ना त्याच्या घरी आले होते आणि पोलिस चौकशीसाठी येऊ शकतात, तु त्यांना काहीही सांगू नको, अशी धमकी त्यांनी दिली होती.

लैंगिक छळ प्रकरणाचा तपास एसआयटी करतेय

हसन जिल्ह्यातील होलेनरसीपुरा मतदारसंघातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) आमदार रेवन्ना हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे मोठे बंधू आहेत. होलेनरसीपुरा पोलिस ठाण्यात पिता-पुत्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी रात्री आणखी एक तक्रार नोंदवण्यात आली. त्याचवेळी, हसनमधील पक्षाचे विद्यमान खासदार प्रज्वल यांच्यावर महिलांच्या लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT