Former Union Minister Dr. Harshavardhana Dainik Gomantak
देश

Delhi: '...म्हणून मी तडक निघालो,' डॉ.हर्षवर्धन यांनी सांगितले कारण

भाजप (BJP) खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन गुरुवारी दिल्लीचे नवे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या शपथविधी कार्यक्रमातून नाराज होऊन परतले.

दैनिक गोमन्तक

भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन गुरुवारी दिल्लीचे नवे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या शपथविधी कार्यक्रमातून नाराज होऊन परतले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते रागाने परत जाताना दिसत आहेत. आता हर्षवर्धन यांनी मीडियामध्ये सुरु असलेल्या बातम्यांबाबत वक्तव्य करत शपथविधी सोहळ्यातून परत येण्याचे कारण दिले आहे. (harsh Vardhan gives reason to return midway in lgs swearing-in ceremony)

दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP) खासदार डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ''अपेक्षित जागा न मिळाल्याने उपराज्यपालांच्या शपथविधी सोहळ्यातून बाहेर पडल्याचे चुकीचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. मी बसलो होतो, तिथे एक अधिकारी बसला, दुसरा अधिकारी मला सीट रिजर्व सांगून उठला! कुठेतरी जागा मिळेल यासाठी मी 15 मिनिटे वाट पाहिली. परंतु जागा मिळाली नाही म्हणून परतलो!''

दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "मी खासदार असून, माझ्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात सक्रिय राहिलो. दिल्लीच्या नवीन उपराज्यपालांच्या शपथविधी समारंभाला मी उपस्थित राहू शकलो नाही याचे खूप वाईट वाटते! नवीन नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना आणि दिल्लीच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन. तुमच्या कार्यकाळात दिल्ली (Delhi) सर्वोत्तम शहर म्हणून नक्कीच उदयास येईल.'' कार्यक्रमातून परतताना खासदार म्हणाले होते की, 'आम्हा संसद सदस्यांसाठीही जागा शिल्लक नव्हती.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT