Jharkhand Crime Dainik Gomantak
देश

Jharkhand Crime: फेसबुकवर मैत्री अन्... फिरायला नेण्याच्या बहाण्याने जंगलात नेले, 3 मुलींवर बलात्कार

Jharkhand: ही घटना झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील आहे. त्याचबरोबर पोलिसांनी तीनही आरोपी तरुणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे.

Manish Jadhav

Jharkhand Crime: 'फेसबुकवर मैत्री आणि अनोळखी तरुणांशी प्रेम', तीन तरुणींना चांगलंच महागात पडलं. तिघींच्याही प्रियकरांनी त्यांची फसवणूक करुन त्यांच्यासोबत बलात्काराची घटना घडवली. ही घटना झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील आहे.

त्याचबरोबर पोलिसांनी तीनही आरोपी तरुणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. हे संपूर्ण प्रकरण गुमला येथील बसिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

दरम्यान, घुमसेरा गावातील तीन तरुणांनी पहिल्यांदा या तरुणींनी फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. यानंतर फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने तिघींनाही कारमधून नेले. यानंतर तिघींनाही जंगलात नेऊन बलात्काराची घटना घडवली.

दुसरीकडे, बराच वेळ होऊनही तिन्ही तरुणी घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत होते. यानंतर नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात जाऊन तरुणींच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून पीडित तरुणींना घुमसेरा जंगलातून ताब्यात घेतले.

पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली

दुसरीकडे, पोलिसांनी गुमला जिल्ह्यातील बसिया पोलिस (Police) स्टेशन हद्दीतील घुमसेरा गावातील रहिवासी अमित बराला, अनिल इंदवार आणि मुन्ना गोप नावाच्या तीन तरुणांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे.

पोलिसांनी तिन्ही तरुणींची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्याचवेळी, बसियाचे एसडीपीओ विकास आनंद लांगुरी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

एसडीपीओ विकास आनंद लांगुरी यांनी सांगितले की, तिन्ही आरोपींनी आरोप स्वीकारले आहेत. त्याचवेळी या घटनेनंतर तिन्ही मुलींच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

गुमला येथेच पाच तरुणांनी सामूहिक बलात्काराची घटना घडवली होती.

मात्र, गुमला येथील बलात्काराची ही पहिलीच घटना नाही. तत्पूर्वी, बिशूनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे पाच तरुणांनी अपहरण करुन सामूहिक बलात्कारासारखी घृणास्पद घटना घडवली होती. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suleman Siddiquie: जमीन हडप प्रकरणी सुलेमानला पुन्हा आणले गोव्यात! न्यायालयाचे निर्देश; 8 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी

Nobel Prize: 2025 वर्षाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल मेरी ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुशी यांना जाहीर

"गोव्यात सुविधांचा आनंद घ्या, दिल्लीत तुम्ही हे करू शकला नाहीत", केजरीवालांना भाजपचा टोला; Post Viral

भाजपाचे बुराक! गोव्यातील खराब रस्त्यांबाबत 'आप'ने CM प्रमोद सावंतांना पाठवली एक लाख पत्र; अरविंद केजरीवालांचाही सहभाग

रतन टाटांच्या लाडक्यानं वेधलं लक्ष! सेंट फ्रान्सिस ऑफ असिसीच्या चर्चमध्ये ‘गोवा’ची उपस्थिती ठरली भावूक; Watch Video

SCROLL FOR NEXT