Crime News Dainik Gomantak
देश

Gujarat Crime: 73 वर्षीय व्यक्तीने कोर्टाबाहेर पत्नीवर केला हल्ला, कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

Gujarat: पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी सूरतच्या उमरा भागातील फॅमिली कोर्टाच्या संकुलाबाहेर एका 73 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीवर चाकूहल्ला केला.

Manish Jadhav

Gujarat Crime: सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी सुरतच्या उमरा भागातील फॅमिली कोर्टाच्या संकुलाबाहेर एका 73 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीवर चाकू हल्ला केला.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही महिला तिच्या पतीकडून 7,000 रुपयांच्या पोटगीची मागणी करत होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी आरोपी विनोद भानुशाली याला ताब्यात घेतले आहे. तर शारदाबेन (68) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, उमरा पोलिस (Police) ठाण्याचे निरीक्षक ए.एच. राजपूत यांनी सांगितले की, पीडिता मासिक सुनावणी ऐकून तिच्या मुलीसोबत दुचाकीवरुन जाण्याच्या तयारीत असताना ही घटना घडली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शारदाबेन गेल्या सहा वर्षांपासून पतीपासून विभक्त राहत होत्या. त्यांनी आरोपी विनोद भानुशालीकडून मासिक भत्त्याची मागणी करत सीआरपीसीच्या कलम 125 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

त्यावर, शनिवारी कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने भानुशाली यांना शारदाबेन यांना मासिक पोटगी म्हणून सात हजार रुपये देण्याचे निर्देश दिले. तसेच या प्रकरणाची सुनावणी 13 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी विनोद भानुशालीने आपल्या मुलीसह पीडिता कोर्टाच्या (Court) बाहेर जाण्याच्या तयारीत हा हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT