Viral Video Dainik Gomantak
देश

VIDEO: ट्रेकिंगचा आनंद अन् मृत्यूशी गाठ! ज्वालामुखीचा अचानक उद्रेक; पर्यटकांची पळापळ, थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Viral Video News: ग्वाटेमालामधील एका सक्रिय ज्वालामुखीवर घडलेली धक्कादायक घटना सध्या जगभर चर्चेचा विषय ठरत आहे.

Sameer Amunekar

ग्वाटेमालामधील एका सक्रिय ज्वालामुखीवर घडलेली धक्कादायक घटना सध्या जगभर चर्चेचा विषय ठरत आहे. निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आणि ट्रेकिंगचा रोमांच अनुभवण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना अचानक मृत्यू समोर उभा ठाकल्याचा अनुभव आला. ‘वोल्कान डी फ्यूगो’ या प्रसिद्ध ज्वालामुखीने अचानक उग्र रूप धारण करत उद्रेक केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून तो पाहून अनेकांच्या अंगावर काटा येत आहे.

अचानक झाला उद्रेक, पर्यटकांची धावपळ

घटनास्थळी उपस्थित असलेले पर्यटक पर्वतरांगांचे सौंदर्य अनुभवत होते. काही जण व्हिडिओ आणि छायाचित्रे टिपण्यात व्यस्त होते. मात्र काही क्षणांतच परिस्थिती पूर्णपणे बदलली. ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणात राख, धूर आणि लालभडक दगड हवेत उडू लागले. आकाशातून जळते दगड आणि अग्निगोळे खाली पडू लागल्याने पर्यटकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनेक जण उताराच्या दिशेने धावताना दिसले. काहींनी सुरक्षित ठिकाण गाठण्याचा प्रयत्न केला, तर काही जण भीतीने किंचाळत होते. व्हिडिओमध्ये ऐकू येणारे आवाज आणि दिसणारे दृश्य संपूर्ण प्रसंगाची भीषणता स्पष्ट करतात.

या गोंधळाच्या वातावरणात एक हृदयस्पर्शी दृश्यही पाहायला मिळाले. एका पर्यटकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून एका भटक्या कुत्र्याला उचलले आणि त्याला सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. संकटाच्या काळातही प्राण्यांप्रती दाखवलेली ही संवेदनशीलता अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.

दरम्यान, काही पर्यटक जळत्या दगडांचे तापमान कमी करण्यासाठी त्यांच्यावर पाण्याच्या बाटल्या ओतताना दिसले. मात्र अशा परिस्थितीत कोणतीही चूक जीवघेणी ठरू शकते, याची जाणीव सर्वांनाच झाली.

महिलेचा थरारक अनुभव

या घटनेतून बचावलेल्या एका महिला पर्यटकाने तिचा अनुभव सांगताना धक्कादायक माहिती दिली. ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना ती त्याचे चित्रीकरण करत होती. त्याच वेळी तिच्या दिशेने वेगाने येणारे जळते दगड तिने पाहिले. त्यापैकी एक दगड तिच्या अंगावरील जॅकेटला स्पर्श करून पुढे गेला. काही सेकंदांचा फरक पडला असता तर गंभीर दुर्घटना घडली असती, असे तिने सांगितले.

धोकादायक ज्वालामुखीचा इतिहास

ग्वाटेमाला सिटीपासून काही अंतरावर असलेला ‘वोल्कान डी फ्यूगो’ हा देशातील सर्वाधिक सक्रिय आणि धोकादायक ज्वालामुखी मानला जातो. लहान-मोठे उद्रेक येथे नियमित घडत असतात. त्यामुळे वैज्ञानिक आणि प्रशासनाकडून सतत त्यावर लक्ष ठेवले जाते.

यापूर्वी 2018 मध्ये झालेल्या भीषण उद्रेकाने अनेक गावे उद्ध्वस्त केली होती. त्या दुर्घटनेत शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या ज्वालामुखीच्या प्रत्येक हालचालीकडे जगभरातील भूगर्भशास्त्रज्ञांचे लक्ष असते.

सोशल मीडियावर रंगली चर्चा

या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी पर्यटक सुरक्षित बचावल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे, सक्रिय ज्वालामुखीच्या परिसरात साहसी पर्यटनासाठी जाणे कितपत योग्य आहे, यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

काहींच्या मते अशा ठिकाणी जाणे हे धाडसाचे लक्षण असले तरी इतरांच्या मते तो विनाकारण जीव धोक्यात घालण्याचा प्रकार आहे. त्यामुळे साहसी पर्यटन आणि सुरक्षितता यांच्यात समतोल राखण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa recruitment: गोव्यात सरकारी कंत्राटी नोकरीची मोठी संधी! 'समग्र शिक्षा'अंतर्गत 37 पदांसाठी पर्वरी येथे वॉक-इन मुलाखत

Reis Magos: रेईश-मागूश ग्रामसभेत राडा! महिला सरपंचांसह शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ, धमकी देणाऱ्या संशयितावर गुन्हा दाखल

Mandovi River: मांडवी नदीचे पात्र प्रदूषितच! प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल अखेर उच्च न्यायालयात सादर

Goa Bench: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागा सुचवा! गोवा खंडपीठाचे आमदार संकल्प आमोणकरांसह स्थानिकांना थेट निर्देश; सुनावणी 21 जुलैपर्यंत तहकूब

Goa Bench: चिंबलमधील बेकायदेशीर 43 बोअरवेल्स मालकांना मोठा दणका! गोवा खंडपीठाचे भूजल अधिकाऱ्यांना कठोर दंडात्मक कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT