Goa Jasidih Train Cancelled Dainik Gomantak
देश

Goa Jasidih Train Cancelled: ऑक्टोबरमध्ये नियोजित गोवा-झारखंड रेल्वे रद्द; दक्षिण पूर्व रेल्वे विभागाचा निर्णय

देशभरातील एकूण 66 रेल्वेगाड्या रद्द

Akshay Nirmale

Goa-Jasidih Train Cancelled: भारतीय रेल्वेकडून देशभरात दररोज शेकडो रेल्वेगाड्या धावत असतात. तथापि, ऑक्टोबर महिन्यातील काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या गोवा, झारखंड, बंगाल, मध्यप्रदेश, दिल्ली या प्रदेशांशी संबंधित आहेत.

दक्षिण पूर्व रेल्वेच्या 66 गाड्या ऑक्टोबरपर्यंत रद्द होणार आहेत. प्रसिद्धीपत्रकातून दक्षिण पूर्व रेल्वेने ही माहिती दिली आहे.

रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये गोवा-जसिदीह (झारखंड) आणि जसिदीह-गोवा या दोन रेल्वेंचाही समावेश आहे. रूरकेला स्टेशन यार्डातील यार्ड रीमॉडेलिंगमुळे 66 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत आणि काही गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत.

13 ऑक्टोबर रोजी 17321 क्रमांकाची गोव्यातून वास्को द गामा-जसिदिह एक्सप्रेस सुटणार होती. ती आता रद्द करण्यात आली आहे. याशिवाय हीच गाडी पुन्हा येताना 17322 या क्रमांकाने येते. ती गाडी जसिदिह (झारखंड) येथून 16 ऑक्टोबर रोजी सुटणार होती पण ती देखील आता रद्द करण्यात आली आहे.

याशिवाय इतर 64 रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यात संत्रागाछी-पुणे हमसफर एक्सप्रेस, हजूर साहिब नांदेड-संत्रागाछी एक्सप्रेस, हावडा-CSMT मुंबई एक्सप्रेस, सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस, संबलपूर-बनारस एक्सप्रेस, बेंगळुरू-हटिया एक्सप्रेस, पुणे-हटिया एक्सप्रेस, भुज-शालीमार एक्सप्रेस, हैदराबाद-रक्सौल एक्सप्रेस, सिकंदराबाद-दरभंगा एक्सप्रेस, उदयपूर-शालीमार एक्सप्रेस या गाड्यांचा यात समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार!म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

SCROLL FOR NEXT